Home /News /national /

चाकूनं भोसकून गर्लफ्रेंडनं केला Boyfriend चा खून, भयानक पद्धतीनं लावली मृतदेहाची विल्हेवाट; कारण ऐकून व्हाल थक्क

चाकूनं भोसकून गर्लफ्रेंडनं केला Boyfriend चा खून, भयानक पद्धतीनं लावली मृतदेहाची विल्हेवाट; कारण ऐकून व्हाल थक्क

पूर्णिया जिल्ह्यात (Purnia district) हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

    बिहार, 17 डिसेंबर: बिहारमधील (Bihar) पूर्णिया जिल्ह्यात (Purnia district) हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरण्यात आला. ही भीषण घटना समोर आल्यानंतर आजूबाजूचे लोकांना धक्काच बसला आहे. या निर्घृण हत्येनं पोलीसही हादरले आहेत. स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, जमिनीच्या वादातून गर्लफ्रेंडनं तिच्याच बॉयफ्रेंडची चाकूनं भोसकून हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह बेडरुममध्ये बेडखाली पुरला. मिळालेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी पूर्णियाच्या सदर पोलीस ठाण्यातील गुलाबबाग येथे राहणारे लँड ब्रोकर संपत पासवान बेपत्ता झाले होते. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय होता. आता त्यांचा मृतदेह त्यांच्याच गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये सापडला आहे.सदर पोलीस स्टेशन सरना चौकाजवळ राहणाऱ्या आशा देवी यांच्या घरातील जमीन खोदून संपत पासवान यांचा मृतदेह सापडला आहे. हेही वाचा-  असं काय झालं...लग्नाच्या 8 दिवसातच पत्नीनं सोडलं पतीला,केलं Boyfriend सोबत लग्न सदर एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी सांगितले की, अवैध संबंध आणि जमिनीच्या वादातून संपत पासवान यांची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी आशादेवीने संपतचा मृतदेह तिच्याच घरात बेडखाली पुरला होता. संपत पासवान हे एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मोबाईल सीडीआरद्वारे पकडलं गर्लफ्रेंडला संपत पासवान बेपत्ता झाल्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईलच्या सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) च्या आधारे पोलिसांनी आशा देवी यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपी आशा देवी हिने या हत्याकांडाचा खुलासा केला. SDPO म्हणाले की, जमिनीच्या व्यवहारावरुन वाद झाला होता. यानंतर आरोपी आशा देवी यांनी संपतची तिच्याच घरात वार करून हत्या केली. आशाने तिच्या साथीदारांसोबत संपतचा मृतदेह बेडरुमच्या बेडखाली पुरला. हेही वाचा- सानिया मिर्झा नवऱ्यासाठी जेवण का बनवत नाही? शोएब मलिकनं केला खुलासा संपत पासवान आणि त्याची महिला मैत्रिण आशा देवी यांच्यासह त्याच्या काही साथीदारांनी हत्येपूर्वी तिथे बसून दारू प्यायल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळाजवळून पोलिसांनी दारूच्या रिकाम्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. घराबाहेर निघताना संपतनं दिलं हे कारण मृत संपत पासवान यांचा मुलगा सनी पासवान याने सांगितले की, त्याचे वडील आठवडाभरापूर्वी जमिनीचे मोजमाप करायला जात असल्याचं सांगून घरातून निघून गेले होते. तेव्हा ते आपल्यासोबत सलाई रिंच (मोजमाप करण्याचं साहित्य) देखील घेऊन गेले होते. मात्र वडील घरी न परतल्याने त्यांनी शोध सुरू केला आणि आशादेवी यांच्या घराजवळील सलाई रिंच सापडलं. याबाबत सनीने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आशा देवी यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली, त्यानंतर आरोपींनी सर्व हत्येचा खुलासा केला. यानंतर आशा देवीच्या घरातून संपतचा मृतदेह सापडला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या