बिहार, 17 डिसेंबर: बिहारमधील (Bihar) जमुई जिल्ह्यात (Jamui district) एक विचित्र विवाह प्रकरण समोर आलं आहे. जमुई शहरातील कल्याणपूर परिसरातील नवविवाहित महिला लग्नाच्या अवघ्या आठ दिवसांतच आपल्या पतीला (husband) सोडून बॉयफ्रेंडकडे (boyfriend) गेली आहे. गेल्या 10 वर्षांपासून ती तिच्या बॉयफ्रेंडवर प्रेम करत होती आणि आता तिला त्याच्यासोबत राहायचे आहे. अशा परिस्थितीत आता नवविवाहित जोडप्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओनुसार, नवविवाहित महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत मंदिरात लग्न केलं आहे. या व्हायरल व्हिडिओत 10 वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या बॉयफ्रेंडसोबत दुसरं लग्न करुन नवविवाहित जोडप्याला समाज आणि पोलीस प्रशासनानं त्रास देऊ नये अशी विनंती केली आहे. या व्हिडीओमध्ये नवविवाहित महिला सांगत आहे की, ज्याच्याशी तिच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं होतं, तो तिला मारहाण आणि छळ करत होता, त्यामुळे लग्नाच्या 8 दिवसानंतरच ती आपल्या पतीला सोडून बॉयफ्रेंडशी लग्न करत आहे. हेही वाचा- विराट कोहलीबाबत BCCI चं धोरण ठरलं, सौरव गांगुलीनं घेतला मोठा निर्णय जमुई जिल्ह्यातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ शहरातील कल्याणपूर परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये ज्या नवविवाहित जोडप्यानं विनंती केली आहे, त्यात महिलेचं नाव शिवानी आणि तिच्या बॉयफ्रेंडचं नाव उत्तम कुमार असं आहे. 2 दिवसानंतरच पतीने मारहाण करण्यास केली सुरुवात शिवानीचे लग्न 8 दिवसांपूर्वी तिच्या आई वडिलांनी जमुई शहरातील कल्याणपूर परिसरात केलं होतं. मात्र दोन दिवसांनंतर तिनं पती शिवानीला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये नवविवाहितेनं आरोप केला आहे की, तिच्या घरच्यांनी ज्या मुलाशी लग्न करुन दिलं होतं. तो बेदम मारहाण करायचा. तसंच छळही करायचा. दोन दिवसांपूर्वीही त्यानं तिला बेदम मारहाण केली होती. 7 डिसेंबर रोजी झालं होतं लग्न मिळालेल्या माहितीनुसार, 7 डिसेंबर रोजी जमुई शहरातील कल्याणपूर परिसरातील रहिवासी असलेल्या शिवानीचं लग्न मुंगेर जिल्ह्यातील दरियापूर येथील रणजीत कुमारसोबत झाला होता. मात्र 8 दिवसांनंतर म्हणजेच 15 डिसेंबर रोजी शिवानी आपल्या बॉयफ्रेंडकडे परत गेली. शिवानीचं गेल्या 10 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं. त्यामुळे पतीच्या मारहाणीला कंटाळून ती सासरच्या घरातून थेट बॉयफ्रेंडकडे गेली आणि तिनं मंदिरात लग्न केलं. हेही वाचा- खतरा..! ब्रिटन- अमेरिकेनं वाढवली चिंता, UK मध्ये Omicron चे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित शिवानीचे उत्तम कुमारसोबत गेल्या 10 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. शिवानीचा बॉयफ्रेंड जमुई शहरातील कल्याणपूर लोकलमध्ये कोचिंग चालवायचा आणि शिवानीही त्याच ठिकाणी शिकायला यायची, तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. 7 डिसेंबर रोजी शिवानीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न मुंगेर जिल्ह्यातील एका व्यक्तीशी लावून दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.