Home /News /national /

पत्नीला बॉयफ्रेंडच्या मिठीत पाहिल्यावर पतीनं लिहिली चिठ्ठी, उचललं धक्कादायक पाऊल

पत्नीला बॉयफ्रेंडच्या मिठीत पाहिल्यावर पतीनं लिहिली चिठ्ठी, उचललं धक्कादायक पाऊल

पोलिसांना एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली. या सुसाईड नोटमध्ये या व्यक्तीनं आपल्या आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं. ते कारण वाचून त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

बिहार, 19 मे:  एक पत्नीव्रत आचरण्याची संस्कृती सांगणाऱ्या आपल्या देशात सध्या विवाहबाह्य संबंधांबद्दलच्या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यात काहीवेळा तर रागाच्या भरात एक व्यक्ती दुसऱ्याचा खूनही करते. त्यात दुसरंही टोक असतं एखादी व्यक्ती आत्महत्याही करते. बिहारमध्ये एका पतीनं आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळाल्यावर गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, पोलिसांना एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली. या सुसाईड नोटमध्ये या व्यक्तीनं आपल्या आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं. ते कारण वाचून त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. चंद्रदेव कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते नालंदा (Nalanda) जिल्ह्यातील लहेरी परिसरात राहायचे. त्यांनी 16 मे 22 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चंद्रदेव कुमार यांचं लग्न 2015 मध्ये झालं होतं. त्यांचा बटाटे आणि कांदे विक्रीचा व्यवसाय होता. त्यांना दोन मुलं आहेत. अचानक 16 मे रोजी त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर चौकशीसाठी पोलीस पोहोचले आणि त्यांना मृतदेहाजवळून एक सुसाइड सापडली. या सुसाईड नोटमध्ये चंद्रदेव यांनी पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाचा (Extra Marital Affair) उल्लेख केला होता. याशिवाय त्यांनी पत्नीवर काही गंभीर आरोप केले होते. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. थिनरच्या फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 हून अधिक गाड्या घटनास्थळी त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, 'घरातून निघून गेलेल्या पत्नीला परत घेण्यासाठी मी पोहोचलो तेव्हा ती तिच्या प्रियकराच्या मिठीत झोपली होती. हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे माझ्या जगण्यात आता काहीही अर्थ नाही. म्हणून मी आता जीव देतोय...' पुढे त्यांनी लिहिलं, ‘पत्नीचे तिच्या क्लासमेट व्यतिरिक्त दुसऱ्या एका तरुणाशीही अनैतिक संबंध होते. मी तिला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलं झाल्यावरही तिला प्रियकरासोबत राहायचं होतं. म्हणूनच मी माझा जीव देत आहे. 8 मे रोजी पत्नी प्रियकराला भेटण्यासाठी घरातून गायब झाली होती. त्यानंतर मी जेव्हा तिला घेण्यासाठी पोहोचलो तेव्हा तिथे ती प्रियकराच्या मिठीत झोपली होती. ती ज्या अवस्थेत तिथे होती, त्याचा उल्लेखही मी करू शकत नाही. त्यानंतरच मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तिला त्या अवस्थेत तिथं पाहून मला खूप वाईट वाटलं. आता माझ्या जगण्याला अर्थ राहिला नाही, त्यामुळे मी जीव देत आहे,’ असं त्या सुसाईट नोटमध्ये लिहून चंद्रदेव आणि गळफास घेतला. मृताच्या भावाने घटनास्थळावरून सापडलेल्या सर्व वस्तू पोलिसांना दिल्या आणि आरोपी वहिनीला अटक करण्याची मागणी केली. ती अनेकदा भावाचा छळ करत असे, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार?, स्वतःहून सांगितलं उत्तर  या प्रकरणी लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रमुख सुबोध कुमार यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘चंद्रदेवने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येला त्याच्या पत्नीला जबाबदार धरलंय. सुसाईड नोटमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख आहे. सध्या पोस्ट मॉर्टेम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई केली जाईल.’  या दुर्दैवी घटनेनंतर चंद्रदेव यांची दोन लहानगी मुलं पोरकी झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bihar, Suicide news

पुढील बातम्या