Home /News /national /

Congress चा राजीनामा दिल्यानंतर हार्दिक पटेल BJP मध्ये प्रवेश करणार?, स्वतःहून दिलं उत्तर

Congress चा राजीनामा दिल्यानंतर हार्दिक पटेल BJP मध्ये प्रवेश करणार?, स्वतःहून दिलं उत्तर

गुजरात निवडणुकीपूर्वी (Gujarat elections) काँग्रेसला मोठा झटका देत राजीनामा देणाऱ्या हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

    गुजरात, 19 मे: गुजरात निवडणुकीपूर्वी (Gujarat elections) काँग्रेसला मोठा झटका देत राजीनामा देणाऱ्या हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल सुरु असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेला नाही किंवा त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. (Hardik Patel Reaction on Joining BJP) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर हार्दिक पटेलबाबत अनेक प्रकारचे चर्चा रंगू लागल्या आहेत. ज्यामध्ये ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात हार्दिक पटेलने कलम 370, राम मंदिर आणि सीएए-एनआरसीचा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांची भाजपमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. मात्र तूर्तास तरी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी नाकारले आहे. Terror Funding Case: फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी गुजरातमधील अहमदाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना हार्दिक पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये ते पाटीदार असोत किंवा इतर कोणत्याही समाजाचे लोक असो, त्यांना काँग्रेसमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. काँग्रेसमध्ये असताना बडे नेते तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात आणि ही त्यांची रणनीती आहे. सोनिया गांधींना पत्र लिहिले याआधी हार्दिक पटेलने ट्विटरवर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्रही सोशल मीडियावर पोस्ट केले. काँग्रेस केवळ निषेधाच्या राजकारणापुरती मर्यादित असल्याचा आरोप हार्दिकने या पत्रात केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी राहुल गांधींवरही जोरदार निशाणा साधला. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी हार्दिकचे जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Gujrat

    पुढील बातम्या