जाहिरात
मराठी बातम्या / देश / थिनरच्या फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 हून अधिक गाड्या घटनास्थळी

थिनरच्या फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 हून अधिक गाड्या घटनास्थळी

थिनरच्या फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 17 हून अधिक गाड्या घटनास्थळी

दिल्लीतील (Delhi) विविध भागात आग लागण्याच्या घटना सुरूच आहे. राजधानी दिल्लीतील बवाना इंडस्ट्रियल एरियातील (Bawana Industrial Area) एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये भीषण आग लागली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मे: दिल्लीतील (Delhi) विविध भागात आग लागण्याच्या घटना सुरूच आहे. मुंडका, (Mundka)नरेला (Narela) आणि रोहिणी न्यायालयानंतर (Rohini courts)आता दिल्लीतील बवाना औद्योगिक परिसरात भीषण आग लागली आहे. राजधानी दिल्लीतील बवाना इंडस्ट्रियल एरियातील (Bawana Industrial Area) एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही तसेच आगीचे कारणही समजू शकलेले नाही. वृत्तसंस्थेने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग दिसत आहे आणि त्याच्या ज्वाळाही खूप भयानक दिसत आहेत. मात्र आतमध्ये लोक आहेत की नाही, आहेत तर किती आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार?, स्वतःहून सांगितलं उत्तर   ज्या ठिकाणी आग लागली ती एक थिनर फॅक्टरी असल्याचे सांगण्यात येत असून येथे 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. याआधी बुधवारी रोहिणी कोर्ट कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावरील न्यायाधीशांच्या चेंबरजवळ आग लागली होती, त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, रोहिणी न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 210 मध्ये आग लागल्याची माहिती सकाळी 11.10 वाजता मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. न्यायाधीशांच्या चेंबरजवळ एका वातानुकूलित यंत्राला (एसी) आग लागली होती. Terror Funding Case: फुटीरतावादी नेता यासिन मलिक दोषी याआधी मुंडका मेट्रो स्टेशनजवळ भीषण आग लागली होती, ज्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमसीडीच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. भाजपनेही अमित शहा यांना पत्र लिहून दिल्लीतील आगीच्या घटनांबाबत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात