नकुल कुमार, प्रतिनिधी पूर्व चम्पारण, 27 जुलै : तुम्हाला शेतीबाबत विशेष रुची असेल किंवा तुम्ही एखादं नवं उत्पादन घेण्याच्या विचारात असाल, तर भोपळा हा तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बिहारच्या पूर्व चम्पारण भागातील पडौलिया गावचे रहिवासी शेतकरी छोटेलाल प्रसाद यादव हे भोपळ्याच्या शेतीतून प्रति महिना 60 हजार रुपये सहज कमवतात. सुपीक जमीन असतानाही पीक न घेणाऱ्यांनी छोटेलाल यांच्या शेतातून प्रेरणा घ्यायला हवी. श्रावण आणि कार्तिक हे भोपळ्याचे दोन हंगाम. श्रवणातील भोपळ्यांसाठी वैशाख महिन्यात बीज पेरावं लागतं, तर कार्तिकी भोपळ्यांसाठी शेतकरी बांधव श्रावणात बीज पेरतात. अशा या भोपळ्याच्या दोन्ही हंगामांमध्ये छोटेलाला उत्पादन घेतात. आपण सहदेव कंपनीचं बीज वापरत असल्याचं छोटेलाल यांनी सांगतलं. त्यांच्याकडे भोपळ्याची एकूण अडीचशे रोपं आहे.
भोपळ्याचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी छोटेलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीज पेरल्यानंतर 60 दिवसांनी भोपळा उत्पादनाला सुरुवात होते. यादरम्यान खत, कीटकनाशके, इत्यादींचा वापर पिकांवर केला जातो. पिकांची योग्यप्रकारे देखभाल केल्यास दिवसाला दीडशे ते साडे तीनशे भोपळे सहज मिळतात. आता, मटण-चिकन नाही! आता ‘या’ चविष्ट मांसाला आहे सर्वाधिक मागणी छोटेलाल स्वतः बाजारात जाऊन भोपळ्यांची विक्री करतात. हंगामात त्यांना 20 रुपयांचा भाव मिळतो, तर हंगाम नसताना 1 भोपळा 30 ते 45 रुपयांना विकला जातो. छोटेलाल यांनी कार्तिकमध्ये येणाऱ्या भोपळ्यांची तयारी आता सुरू केली आहे. या महिनाअखेरीस बीज पेरणी पूर्ण झाली तर ऑक्टोबरअखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला पीक फळायला सुरुवात होईल, असं ते म्हणाले.