मराठी बातम्या /बातम्या /देश /

ISI च्या षडयंत्राचा मोठा खुलासा, भारताविरुद्ध आखताहेत हे पाच मास्टर प्लान

ISI च्या षडयंत्राचा मोठा खुलासा, भारताविरुद्ध आखताहेत हे पाच मास्टर प्लान

ISI च्या नव्या प्लानबद्दल गुप्तचर यंत्रणांनी अलर्टद्वारे शेअर केले आहे.

ISI च्या नव्या प्लानबद्दल गुप्तचर यंत्रणांनी अलर्टद्वारे शेअर केले आहे.

ISI च्या नव्या प्लानबद्दल गुप्तचर यंत्रणांनी अलर्टद्वारे शेअर केले आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी स्पेशल सेलने दिल्ली आणि इतर राज्यांतून दहशतवाद्यांच्या मोठ्या मॉड्यूलला अटक केली. या दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान पाकिस्तान आणि ISI (Pakistan-ISI) च्या प्लान बद्दल मोठे खुलासे केले होते. मात्र आता पहिल्यांदाच ISI ची नवा प्लानचा (ISI Planning agaisnt India)खुलासा झाला आहे. ISI च्या नव्या प्लानबद्दल गुप्तचर यंत्रणांनी अलर्टद्वारे शेअर केले आहे. झी न्यूजनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

गुप्तचर यंत्रणांनी जारी केला अलर्ट

ISI आणि अंडरवर्ल्डच्या (Underworld) टेरर मॉड्यूलचा मास्टर प्लॅन आहे. ज्यामध्ये ISI एअरलाईन थांबवण्यासाठी सायबर हल्ल्याचा कट रचत असल्याचं उघड झालं आहे. याशिवाय पावर ग्रीडसह हिंदू नेत्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा- IPL 2021: KKR वाढवणार सर्वांची डोकेदुखी, आक्रमक खेळाडू येणार टीममध्ये परत

भारताच्या विरोधात मोठे 5 मास्टर प्लॅन

ISI षडयंत्राचा पहिला खुलासा

समोर आलेल्या अलर्टनुसार, ISI भारतातील विमानसेवेला लक्ष्य करण्यासाठी सायबर हल्ल्याचा प्लान आखत आहे. एटीसी रूम (Air Traffic Control Room) मध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीला पेन ड्राइव्हमध्ये असे सॉफ्टवेअर दिले जाईल, जेव्हा तो ते सॉफ्टवेअर पेन ड्राईव्हमधून सिस्टममध्ये टाकेल. त्यानंतर एटीसी काम करणं थांबवेल आणि संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होईल. यामुळे, मोठ्या प्रमाणावर विमान क्रॅश होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- तालिबानचा मनात धडकी भरवणारा नवा Video समोर

ISI कटाचा दुसरा खुलासा

ISI आपल्या कटात RSS शाखांवर, हिंदू धार्मिक स्थळांवर आणि सार्वजनिक सभांवर हल्ल्यांचा प्लान आखत आहे.

ISI कटाचा तिसरा खुलासा

पाटणामध्ये महात्मा गांधी सेतू, पूल, रेल्वे ट्रॅक इत्यादी दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. जेणेकरून कनेक्टिव्हिटी थांबवता येईल.

ISI च्या षडयंत्राचा चौथा खुलासा

आयएसआय पॉवर ग्रीड अयशस्वी करण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे देशात वीज संकट आणि ब्लॅकआउट होईल.

ISI कटाचा पाचवा खुलासा

आयएसआयच्या निशाण्यावर मोठे नेते आहे. याशिवाय इस्लामच्या विरोधात बोलणारेही ISIच्या हिटलिस्टवर आहेत.

First published:

Tags: ISIS