मराठी बातम्या /बातम्या /देश /

ज्योतिरादित्य शिंदेंच्या सुरक्षेत मोठी चूक; 14 पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन

ज्योतिरादित्य शिंदेंच्या सुरक्षेत मोठी चूक; 14 पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन

या निष्काळजीपणामुळे 14 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

या निष्काळजीपणामुळे 14 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

या निष्काळजीपणामुळे 14 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

ग्वाल्हेर, 21 जून : भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी चूक घडल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर 14 पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबनही करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना ते ग्वाल्हेर दरम्यान त्यांच्या गाडीच्या सुरक्षेसाठी तैनात एस्कॉर्ट वाहन तब्बल 8 किमीपर्यंत कोणा दुसऱ्या गाडीचा पाठलाग करीत होता. या निष्काळजीपणामुळे 14 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ज्योतिरादित्यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.

शिंदे दिल्लीहून ग्वाल्हेरला जात होते, तेव्हा हा प्रकार घडला. सायंकाळी मुरैना जिल्ह्यातील एस्कॉर्ट वाहन शिंदेंच्या गाडीमागे ग्वाल्हेरच्या दिशेने जात होतं. निरावलीजवळ मुरैना-ग्वाल्हेर बॉर्डरवर वाहन चालक गोंधळला आणि त्याने शिंदे यांच्या गाडीचा रंग असलेल्या दुसऱ्या गाडीचा पाठलाग सुरू केला. 8 किमीपर्यंत पोलीस चुकीच्या रस्त्याने जात होती. साधारण 8 किलोमीटरपर्यंत पोलीस चुकीच्या रस्त्याने जात होती. जेव्हा पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांना धक्काच बसला. दरम्यान शिंदेंची गाडी खूप पुढे निघून गेली होती. जेव्हा शिंदेची गाडी हजारी पोलीस ठाण्याच्या समोरुन गेली तेव्हा सुरक्षेत चूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर कारवाई करीत मुरैनातील 9 आणि ग्वाल्हेर ठाण्यातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं.

हे ही वाचा-शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक संपली, भाजपविरोधात ठरला नवा प्लॅन?

भाजपचे राज्यसभा सदस्य ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस पार्टीला सल्ला दिली आहे. त्यांनी सांगितलं की, काँग्रेसने आपलं नाव बदलून लोकांच्या हृदय जागा मिळवावी. शिंदे यावेळी ग्वाल्हेरचं नाव बदलल्याच्या कॉग्रेस नेत्यांच्या मागणीबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होते. शिंदेंनी सोमवारी पत्रकारांना सांगितलं की, कोरोना सारख्या महासाथीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांना राजकारण दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या काही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी 18 जून रोजी ग्वाल्हेरचं नाव बदलून महाराणी लक्ष्मीबाई करण्याची मागणी केली होती. यावर शिंदे म्हणाले की, आपलं पंतप्रधान यापूर्वीच म्हणाले आहे की, काँग्रेस नामदार लोकांची पार्टी आहे आणि भाजप कामदार लोकांची.

First published:

Tags: Jyotiraditya scindia, Madhya pradesh