इंग्रज देश सोडताना उष्ट म्हणून काँग्रेसला सोडून गेले, मोदींच्या मंत्र्यांची जहरी टीका!

इंग्रज देश सोडताना उष्ट म्हणून काँग्रेसला सोडून गेले, मोदींच्या मंत्र्यांची जहरी टीका!

भारताला इंग्रजांनी लुटले आणि देश सोडून जाताना उष्ट म्हणून काँग्रेसला सोडून गेले, अशा जहरी शब्दात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी काँग्रेसवर टीका केली.

  • Share this:

भोपाळ, 04 मे: भारताला इंग्रजांनी लुटले आणि देश सोडून जाताना उष्ट म्हणून काँग्रेसला सोडून गेले, अशा जहरी शब्दात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी काँग्रेसवर टीका केली. भोपाळ येथे पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

भारताला पहिल्यांदा मुगलांनी लुटले. त्यानंतर इंग्रजांनी देशातील सर्व संपत्ती लुटली आणि भारत सोडून जाताना उष्ट म्हणून काँग्रेसला सोडून गेल्याचे उभा भारती म्हणाल्या. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारताने गेल्या एक हजार वर्षापासून सुरु असलेल्या अपमानाचा बदला घेतला आहे. गांधी आडनाव वापरण्यावरून देखील उभा भारती यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्ला चढवला. नेहरू-गांधी घराणे खरे आहे.पण हे लोक बनावट आडनाव वापरतात, असा हल्लाही उमा भारती यांनी केला.

भाजपने कर्जाची परत फेड केली

साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासोबत जे काही झाले ते अन्य कोणत्या मुलीसोबत झाले असते तर ती कोसळून गेली असती. काहींना असे वाटत होते की साध्वींला बोलत करून त्याचा अजेंडा करु. पण साध्वीनं असं काही केलं नाही आणि भाजपवर उपकार केले. पक्षाने देखील भोपाळमधून तिकीट देत कर्जाची परत फेड केली. ज्यावेळी कसाबला बिस्लेरीचे पाणी दिले जाते होते. तेव्हा प्रज्ञासिंग यांना पिण्यासाठी काय दिले जात होते हे सांगू शकत नाही, असा आरोप उमा भारती यांनी केला.

SPECIAL REPORT : दानवेंनी खरंच जावयाला लाखोंची रसद पुरवली का?

First published: May 4, 2019, 8:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading