जाहिरात
मराठी बातम्या / देश / Lokckdownमुळे माओवाद्यांचे जेवणाचे वांदे, गावकऱ्यांचं लुटताहेत धान्य

Lokckdownमुळे माओवाद्यांचे जेवणाचे वांदे, गावकऱ्यांचं लुटताहेत धान्य

Lokckdownमुळे माओवाद्यांचे जेवणाचे वांदे, गावकऱ्यांचं लुटताहेत धान्य

लॉकडाऊनमळे जंगलात दडून बसलेल्या माओवाद्यांचा रसदपुरवठाच बंद झाला आहे. त्यांच्याकडे असलेलं धान्य संपलं असून बाहेरून येणारा पुरवठा बंद झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनोज राठौड, भोपाळ 16 एप्रिल: लॉकडाऊनमुळे सगळ्या देशातलेच व्यवहार ठप्प आहेत. लोकांना याचा फटका बसलाय. उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे आर्थिक चक्र थंडावलंय. आता याचा फटका जंगलात दडून बसलेल्या माओवाद्यांनाही बसू लागला आहे. त्यांच्या जेवणाचे वांदे होत असून हे हाल कमी करण्यासाठी ते खेड्या पाड्यांमधून धान्य लुटत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लॉकडाऊनमळे जंगलात दडून बसलेल्या माओवाद्यांचा रसदपुरवठाच बंद झाला आहे. त्यांच्याकडे असलेलं धान्य संपलं असून बाहेरून येणारा पुरवठा बंद झाल्याने आता खायचं काय असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे हे माओवादी आदिवासी खेड्यांमधून धान्य लुटत आहेत आणि आदिवासींकडे अन्न धान्यासाठी तगादा लावत आहेत. अशा अनेक तक्रारी पोलिसांना छत्तिसगड आणि मध्यप्रदेशात मिळाल्या आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या घनदाट जंगलांमध्ये या माओवाद्यांचं अस्तित्व आहे. अशा काही तक्रारी मिळाल्या असल्याची माहिती बालाघाटचे एसपी अभिषेक तिवारी यांनी दिली. ज्या ठिकाणी तक्रारी आल्यात त्या सर्व ठिकाणांचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तबलिगी जमात नंतर रोहिंग्यामुळे कोरोना पसरण्याची भीती? गृहंमत्रालयाने दिला इशारा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातही पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली असून परिस्थितीतीवर ते लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, कोरोनावरून सर्व जगात चीनबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.  तातडीची गरज असल्याने भारताने चीनमधून 63 हजार PPE किट Personal protective equipment(PPE) kits मागवल्या होत्या. त्या सर्व किटचा दर्जा निकृष्ट असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. यातल्या काही किट या भारताने विकत घेतल्या होत्या तर काही या देणगीच्या स्वरुपात मिळाल्या होत्या. सरकारने दर्जाच्या संदर्भात जे नियम घालून दिले होते. त्या मानकांचं पालन होत नाही असंही आरोग्य मंत्रालयांच्या सूत्रांनी सांगितलं. चीन अशाच प्रकरच्या किट जगभर निर्यात करत आहे.

गर्भवती महिलेला मिळाली नाही Ambulance, पोलिस जीपमध्ये दिला मुलाला जन्म

भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी, काही राज्यांमध्ये मात्र मृत्यू दर कमी झाला आहे. त्यामुळे भारताने कोरोनावर मात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत प्रथमच 260 लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमानातून बरे झाले आहे . एकाच दिवशी निरोगी होण्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला. आतापर्यंत भारतात 1,748 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा हा 437 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात