नवी दिल्ली 16 एप्रिल: लॉकडाऊनमुळे सगळा देश ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी वाहतूक बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. राजधानी दिल्लीत एका गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी Ambulance मिळाली नाही त्यामुळे ती महिला पोलिसांच्या गाडीत हॉस्पिटलमध्ये निघाली होती. मात्र वाटेतच तिला प्रसववेदना सुरू झाल्या आणि ती बाळांत झाली. आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत. दिल्लीतल्या रघुवीरनगरमधली ही घटना आहे. एका महिलेला नऊ महिने पूर्ण झाले होते. आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल याची तिला जाणीव झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी Ambulanceसाठी प्रयत्न केले मात्र त्यांना Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे मग त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला मदत मागितली. पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलला सोबत देत आपली गाडी महिलेला दिली. महिला हॉस्पिटलजवळ येताच तिला कळा सुरू झाल्या आणि तिने मुलाला जन्म दिला. पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलमधल्या नर्सला बोलावून घेतलं आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आता दोघांचीही प्रकृती उत्तम असून महिला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांचे आभार मानले आहेत. हे वाचा - BREAKING: Air Forceच्या ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, पाक सीमेजवळ थरार भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी, काही राज्यांमध्ये मात्र मृत्यू दर कमी झाला आहे. त्यामुळे भारताने कोरोनावर मात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत प्रथमच 260 लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमानातून बरे झाले आहे . एकाच दिवशी निरोगी होण्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला. आतापर्यंत भारतात 1,748 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. मृतांचा आकडा हा 437 आहे. हे वाचा - लॉकडाऊनमध्ये तुमची नोकरी गेली किंवा पगार कापला तर थेट पंतप्रधान घेणार आढावा दरम्यान, गृह मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, परंतु त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होईल. याआधी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चांगले निकाल दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.