नवी दिल्ली 16 एप्रिल: तबलिगी जमात कार्यक्रमानंतर कोरोना देशात झपाट्याने पसरला. नंतरही त्यात सहभागी झालेल्या लोकांनी आपली ओळख लपवून ठेवली. ज्यांना क्वारंटाइन केलं गेलं त्यांनीही उपचारादम्यान योग्य सहकार्य केलं नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर आता नवीनच माहिती समोर आली आहे. तबलिगी जमातमध्ये रोहिंग्यांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांचीही माहिती काढावी असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. रोहिंग्या आणि तबलिगी जमातचं कनेक्शन शोधण्याचे आदेशही दिले गेले आहेत. दिल्ली, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये हे रोहिंग्या दिल्लीतल्या कार्यक्रमानंतर परतले मात्र ते ट्रेस होत नाहीत. त्यांनाही कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन टेस्ट करणं आवश्यक आहे. हैदराबाद आणि दिल्लीतल्या शाहीन बाग इथं राहणारे रोहिंग्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते ते पुन्हा परतले नाहीत अशी माहिती दिली जातेय. त्यामुळे त्या सगळ्यांना ट्रेस करून त्यांची चाचणी करा असंही गृहमंत्रालयाने राज्यांना म्हटलं आहे. गर्भवती महिलेला मिळाली नाही Ambulance, पोलिस जीपमध्ये दिला मुलाला जन्म भारतात कोरोनाव्हायरस झपाट्याने पसरत आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. गृह मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मेच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, परंतु त्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होईल. याआधी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये चांगले निकाल दिसत आहेत.
Air Forceच्या ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, पाक सीमेजवळ थरार
राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी योग्यवेळी लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घटली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्यांने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. कोरोना रूग्णांची आता भारतात वेगाने चाचणी घेण्यात येत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अशा सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे.