मराठी बातम्या /बातम्या /देश /

या सेल्फीमधला कोणीही नाही जिवंत, चार दिवसात संपलं अख्खं कुटुंब

या सेल्फीमधला कोणीही नाही जिवंत, चार दिवसात संपलं अख्खं कुटुंब

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या (Family Suicide Attempt)केली आहे.

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या (Family Suicide Attempt)केली आहे.

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या (Family Suicide Attempt)केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

भोपाळ, 29 नोव्हेंबर: मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या (Family Suicide Attempt)केली आहे. दोन दिवसांपूर्वी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबातील एक-एक सर्वांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता या कुटुंबातील शेवटच्या सदस्याचाही मृत्यू झाला आहे. कुटुंबाने सुसाइट नोटमध्ये आत्महत्येचं कारण दिलं आहे.

आनंदनगरमधील अशोक विहारमधील संजीव जोशीच्या कुटुंबाने आत्महत्या केली आहे. त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये बबली दुबे, तिची मुलगी राणी दुबे, पिंकी, राजू राय, लक्ष्मी राय, ओम, उर्मिला आणि आरती यांची नावं लिहिली आहेत. या सर्वांना त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे.

बबली ही अशोका गार्डन येथे राहणारी आहे. संजीव जोशीची पत्नी अर्चनाने या सर्वांचे नावं आणि मोबाइल नंबर सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहेत. दुसरीकडे संजीव जोशी, त्याची पत्नी अर्चना, आई नंदनी, दोन मुली पूर्वी आणि गिरिश्मा यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेत आता सर्वांचा मृत्यू झाला.

हेही वाचा- विजय देवरकोंडाचे अनन्या पांडेसोबतचे फोटो व्हायरल, अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत

अर्चनाने बबलीनं केलेल्या अत्याचाराबद्दल सविस्तर माहिती सुसाइड नोटमध्ये दिली आहे. बबलीने आपला खूप छळ केल्याचं तिने म्हटले आहे. बुधवारी बँकेत घरी आल्यानंतर बबलीने घराजवळ गोंधळ घातला. यावेळी उर्मिलाही सोबत होती. व्यवहाराची रक्कम भरण्यासाठी ते त्यांचे घरही विकत होते पण बबलीचा यावर विश्वास बसत नव्हता. बुधवारी त्यांनी पैसे परत न केल्याचा आरोप कुटुंबीयांवर केला होता.

सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, व्यवहाराचे पैसे देण्यासाठी घर विक्रीसाठी करारही झाला होता, मात्र बबलीचा यावर विश्वास नव्हता. तिची मुलगी उर्मिलाने आईला शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांनी फोनवर पूर्वी आणि गिरिश्मा यांना उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली होती. या त्रासामुळे कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

3.72 लाख देण्यासाठी तयार असतानाही...

सुसाइडसाठी विष घेण्यापूर्वी त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे की, 3 लाख 72 हजार रुपये देण्यासाठी ते तयार होते. मात्र तरीही त्यांना अपमानित करण्यात आलं. यानंतर काहीही पर्याय नसल्याचा विचार करून कुटुंबाने आत्महत्येचा निर्णय घेतला.

हेही वाचा- IND vs NZ: न्यूझीलंडच्या 'नाईट वॉचमन'नं दमवलं, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

सुसाइड करणाऱ्या कुटुंबाने राजू राय आणि लक्ष्मी राय यांचं नाव लिहिलं आहे. ज्यात 30 हजार रुपयांच्या उधारावर व्याज दोन लाख वसुल करण्याचं लिहिलं आहे. कुटुंबाने दावा केला आहे की, त्यांनी 23 नोव्हेंबर पर्यंत व्याज दिलं आहे. एका दिवसासाठी त्यांच्याकडून 5 रुपये व्याज घेण्यात आलं.

गॅस सिलिंडरने उडवण्याची दिली धमकी

पीडित कुटुंबाने सुसाइड नोटमध्ये ममता शर्माचं नाव लिहिलं आहे. ज्यात त्यांनी दिल्यानुसार ममताने गॅस सिलेंडरने उडवण्याची धमकी दिली होती. यानंतर त्यांनी विदिशा हॉटेलमध्ये लपून जीव वाचवला असल्याचं सांगितलं होतं. जोशी कुटुंबाने सुसाइड नोटमध्ये दिल्यानुसार, ते मुलांच्या शाळेची फीदेखील देऊ शकले नाही. जोशी कुटुंबाने मृत्यूनंतर कोणत्याही नातेवाईकांनी न येण्याचं सांगितलं आहे. वेळेवर आला असता तर कुटुंब वाचू शकलं असतं असंही यात लिहिलं आहे.

First published:

Tags: Bhopal News, Madhya pradesh, Suicide case