मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विजय देवरकोंडाचे अनन्या पांडेसोबतचे फोटो व्हायरल, अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत

विजय देवरकोंडाचे अनन्या पांडेसोबतचे फोटो व्हायरल, अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत

 साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay devarakonda) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड  (Vijay devarakonda Bollywood Debut) डेब्यूवरून चर्चेत आहे.

साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay devarakonda) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड (Vijay devarakonda Bollywood Debut) डेब्यूवरून चर्चेत आहे.

साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay devarakonda) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड (Vijay devarakonda Bollywood Debut) डेब्यूवरून चर्चेत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर : साऊथचा सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay devarakonda) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड  (Vijay devarakonda Bollywood Debut) डेब्यूवरून चर्चेत आहे. देवराकोंडा हा हिंदी चित्रपट ‘लाइगर’ (Liger)मुळे चर्चेत आहे. ज्याचे शूटिंग सध्या लॉस एंजेलिसमध्ये सुरू आहे. नुकतेच त्याने सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सहकलाकार अनन्या पांडे (Ananya Panday) आणि चार्मी कौर (Charmy Kaur) दिसत आहेत. दोघांनी खांद्यावर हात ठेवला आहे. फोटोमध्ये, विजय देवराकोंडा पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पँटसह जॅकेट घातलेला दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'हॅलो फ्रॉम लॉस एंजेलिस'... म्हणजेच थेट चित्रपटाच्या लोकेशनवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हे याआधी ‘लाइगर’ (Liger) चित्रपट लास वेगासमध्ये शूट केला गेला होता आणि आता टीम एलएला पोहोचली आहे.

या फोटोत दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Jagannath Puri) देखील पोज देताना दिसत आहे. ‘लाइगर (Liger)' मध्ये देवराकोंडा मुख्य भूमिकेत असून त्याच्या विरुद्ध अनन्या पांडे दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच पडद्यावर एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. विजय देवरकोंडा दक्षिणेतील सुपरस्टार्समध्ये मोडतो. आता तो हिंदी चित्रपटातून उत्तर भारतातील प्रेक्षकांना कितपत प्रभावित करतो हे पाहावे लागेल.

विशेष म्हणजे अमेरिकन बॉक्सर माइक टायसनही (Mike Tyson) लिगरमध्ये दिसणार आहे. जो नुकताच शूटिंगमध्ये देवराकोंडासोबत दिसला होता. चित्रपटात हे दोन सेलिब्रिटी रिंगमध्ये एकमेकांसमोर येणार आहेत. याशिवाय चित्रपटात अभिनेत्री रम्या कृष्णन, रोनित रॉय, विशू रेड्डी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

वाचा : 'भावा कतरिनाची काळजी घ्ये'; विकी कौशल-रणबीर कपूरच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्याची भन्नाट कमेंट

बॅनरखाली पॅन इंडिया चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या(Dhrama Production) होत आहे. Liger 2022 मध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होईल. Liger नावाबद्दल सांगायचे तर, याचा अर्थ अर्धा सिंह आणि अर्धा वाघ आहे. अनोख्या नावाने त्याचे पोस्टर रिलीज झाले तेव्हा विजयचा फायटर लुक देखील शेअर केला होता.

First published: