मराठी बातम्या /बातम्या /देश /Bhopal Gas Leak : गॅसगळतीने भोपाळ हादरले, अनेकजण रुग्णालयात, 90 च्या दशकाची आठवण

Bhopal Gas Leak : गॅसगळतीने भोपाळ हादरले, अनेकजण रुग्णालयात, 90 च्या दशकाची आठवण

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये गॅस गळती झाली आहे. ही गॅस गळती भोपाळच्या जलशुद्धीकरण केंद्रात घडली.

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये गॅस गळती झाली आहे. ही गॅस गळती भोपाळच्या जलशुद्धीकरण केंद्रात घडली.

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये गॅस गळती झाली आहे. ही गॅस गळती भोपाळच्या जलशुद्धीकरण केंद्रात घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

भोपाळ, 27 ऑक्टोबर : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये गॅस गळती झाली आहे. ही गॅस गळती भोपाळच्या जलशुद्धीकरण केंद्रात घडली. इदगाह हिल्स येथे काल (दि.27) रात्री पाणी साफ करण्यासाठी बसवण्यात आलेल्या क्लोरीन टाकीतून गॅस गळती झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर तब्बल तीन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. इतर अनेक जण आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान भोपाळमध्ये यापूर्वी गॅस गळती झाल्याने मोठी दुर्घटना झाली होती. यामुळे अनेकांनी याची धास्ती घेतली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमधील जलशुद्धीकरण केंद्रात ही घटना घडली आणि गॅस गळतीमुळे अनेकांना घराबाहेर राहावे लागले. घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

हे ही वाचा : जंगलात आढळले तब्बल 40 माकडांचे मृतदेह, या पूर्वीही घडल्या होत्या अशा घटना

याबाबतची माहिती मिळताच भोपाळचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी पोहोचले. परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात बसवण्यात आलेल्या 900 किलो वजनाच्या क्लोरीन गॅस सिलिंडरच्या नोझलमध्ये बिघाड झाल्यामुळे गळती सुरू झाल्याचे तपासात आढळून आले. तपासासाठी नेमलेल्या पथकाने पाण्यात 5 किलो कॉस्टिक सोडा टाकून परिस्थिती आटोक्यात आणली. परिसरातील तीन जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांचा धोका टळल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री विश्वास सारंग आणि भोपाळच्या महापौर मालती राय यांनी हमीदिया हॉस्पिटलमध्ये पोहोचून पीडितांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खबरदारीचा उपाय म्हणून आज (दि. 27) बाधित भागात पाणीपुरवठा केला जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : कार पार्किंगच्या वादात गेला माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा जीव; हाणामारीत मृत्यू

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या मदर इंडिया कॉलनीमध्ये, क्लोरीन गॅसच्या टाकीतून गळती झाल्यामुळे डोळ्यांना जळजळणे श्वास घेण्यास त्रास झाल्याचे तसेच काही लोकांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आली असल्याची माहिती मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी दिली. तसेच या प्रकरणात, सर्व पीडितांच्या उपचारासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, सर्व आवश्यक सुरक्षा उपाय योजले जावेत,असेही कमलनाथ म्हणाले.

रुग्णालयात दाखल केलेले तिघेही बरे होऊन आता घरी परतले आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गॅस गळती म्हटले की भोपाळ वासियांना 90 च्या दशकातील भयानक भोपाळ गॅस दुर्घटनेची आठवण येते. जी एक भयानक दुर्घटना होती. ज्यामध्ये अनेकांच्या पिढ्यांना वेगवेगळे आजार झाले. त्यामुळे आता लहानशा गॅस दुर्घटनेमुळे देखील परिसरात मोठी खळबळ आणि भीती निर्माण होत असते.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Gas