मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सेवेतून निलंबित, शिस्तभंगाची कारवाई सुरु

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सेवेतून निलंबित, शिस्तभंगाची कारवाई सुरु

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांना सेवेतून निलंबित केलं आहे.

मुंबई, 03 डिसेंबर: कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी राज्य सरकारनं (Maharashtra Government) गुरुवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांना सेवेतून निलंबित केलं आहे.

यासोबतच खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सिंग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली. डीसीपी दर्जाचे पोलीस परमबीर सिंग यांच्यावर खंडणीच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आला आहे. 12 नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी परमबीर यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यासोबतच ठाणे शहराचे डीसीपी असलेले पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचा- खेळ पडला भलताच महागात; मित्राने ब्लेडने कापला मुलाचा प्रायव्हेट पार्ट अन्...

राज्याच्या गृहविभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की 1988-बॅचच्या भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्याला अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत निलंबित करण्यात आलं होतं. परमबीर यांच्यावर अनियमितता आणि कर्तव्य न बजावल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली होती निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी

परमबीर सिंग यांनी 200 दिवसांहून अधिक दिवस गृह विभागाला न कळवता परस्पर सुट्टी घेतली होती. त्या संदर्भातही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आली. आता निलंबन करण्यात आलंय याच्या पुढची कारवाई थेट सेवेतून बडतर्फ असणार आहे. परमबीर सिंग यांच्यावर पाच वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.

ड्युटीवर नसतानाही परमबीर सिंग यांच्याकडून सरकारी गाडीचा वापर

परमबीर सिंग हे अचानक गायब झाले आणि अखेर 234 दिवसांनी ते मुंबईत परतले. मुंबईत परतले परमबीर सिंग हे ड्युटीवर अद्यापही हजर नाहीयेत आणि असे असतानाही ते सरकारी गाडीचाच वापर करत आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. (Dilip Walase Patil on Parambir Singh using official car)

First published:

Tags: Mumbai police, Paramvir sing