मराठी बातम्या /बातम्या /करिअर /क्या बात है! IT कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते आठवड्यातून 3 दिवस सुटी; 4 दिवसच करावं लागणार काम

क्या बात है! IT कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते आठवड्यातून 3 दिवस सुटी; 4 दिवसच करावं लागणार काम

आता काही कंपन्यांमध्ये IT कर्मचाऱ्यांना 4 दिवसच  काम करावं लागणार आणि 3 दिवस सुटी मिळू शकणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

आता काही कंपन्यांमध्ये IT कर्मचाऱ्यांना 4 दिवसच काम करावं लागणार आणि 3 दिवस सुटी मिळू शकणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

आता काही कंपन्यांमध्ये IT कर्मचाऱ्यांना 4 दिवसच काम करावं लागणार आणि 3 दिवस सुटी मिळू शकणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर: कोरोनामुळे संपूर्ण जगभरात अनेक कंपन्यांवर चांगले वाईट परिणाम झाले आहेत. अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस अली आहे तर अनेक कंपन्यांना नफा (Profit of IT companies in Corona) झाला आहे. या काळात बहुतांश कंपन्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work from end news) करण्याची संधी दिली. अनेक कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होमची सवय झाली आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे काही IT कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलावण्याचा (4 day work culture in IT companies) विचार करत आहेत. मात्र आता काही कंपन्यांमध्ये IT कर्मचाऱ्यांना 4 दिवसच  काम करावं लागणार आणि 3 दिवस सुटी मिळू शकणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

भविष्यात कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासह घालवण्याची संधीही मिळावी आणि ऑफिसचं कामही करता यावं. तसंच कर्मचाऱ्यांचं जीवन अधिक सुखकर बनवावं यासाठी 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी (4 days work culture in IT sector) असा निणर्णय अनेक कंपन्या घेण्याची शक्यता आहे. यासंबंधीचं वृत्त लाईव्ह मिंटनं प्रकाशित केलं आहे.

हे वाचा - Infosys Recruitment : Infosys विविध पदांसाठी फ्रेशर्सना देणार नोकरीची संधी

सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसी सिक्युरिटी (TAC security) 4 दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यात स्थलांतरित झाली आहे. कर्मचाऱ्यांना चांगलं काम करावं यासाठी गेल्या 7 महिन्यांपासून ही कंपनी शुक्रवारी बंद ठेवण्यात येत आहे. जर या प्रयोगामुळे कामगार अधिक उत्पादनक्षम आणि आनंदी राहत असतील तर ही कंपनी आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये भविष्यात  4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी हे धोरण राबवणार आहे असं कंपनीचं म्हणणं आहे.

बऱ्याच IT कंपन्यांमधील एका सर्व्हेनुसार तब्बल 80 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी आणि टीम्स आठ्वड्यार्तून चार दिवस काम करण्यास इच्छुक आहेत. त्यांना हे चार दिवस अधिक तास काम करावं लागलं तरी यासाठी ते तयार आहेत. मात्र त्यानंतर मिळणाऱ्या तीन दिवसांच्या सुटीमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळ मिळू शकणार आहे.

ज्या कंपन्यांमध्ये सध्या 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी हे धोरण आहे. त्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी इतर काही कोर्सेससाठी किंवा इतर अभ्यासक्रमांसाठी स्वतःला रजिस्टर केलं आहे. शनिवारी आणि रविवारी मिळणाऱ्या वेळातून ते आपले स्किल्स वाढवण्यात सक्षम असणार आहेत. यामुळे त्याकंपनीला ही फायदा होऊ शकणार आहे.

हे वाचा - Amazon Recruitment: Amazon मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची सर्वात मोठी संधी

त्यामुळे जर हे धोरण अनेक IT कंपन्यांनी अवलंबलं तर कर्मचारी आणि कंपनी या दोघांचाही फायदा होणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांना या चार दिवसांच्या कामामध्ये अधिक तास काम करावं लागणार आहे.

First published:

Tags: Work from home, जॉब