Home /News /national /

Bhabanipur bypoll result 2021: काही तासात ठरेल ममता बॅनर्जींचं भवितव्य, मुख्यमंत्रीपदासाठी भवानीपूरची जागा जिंकणं महत्त्वाचं

Bhabanipur bypoll result 2021: काही तासात ठरेल ममता बॅनर्जींचं भवितव्य, मुख्यमंत्रीपदासाठी भवानीपूरची जागा जिंकणं महत्त्वाचं

Bhabanipur bypoll result 2021: पश्चिम बंगालची कमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातात राहिल की नाही याचा निर्णय आज होणार आहे.

  कोलकात्ता, 03 ऑक्टोबर: आज ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. पश्चिम बंगालची कमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातात राहिल की नाही याचा निर्णय आज होणार आहे. आज भवानीपूर जागे (Bhabanipur By-Poll Result 2021) वरझाले ल्या मतदानाची आज मतमोजणी आहे . भवानीपूर व्यतिरिक्त, शमशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठीही झालेल्या मतदानाच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल (BJP Priyanka Tibrewal) रिंगणात आहेत. हेही वाचा- Avalanche in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात मुंबईतील नौदलाच्या 4 जवानांचा बळी
   पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. आता मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी त्यांना ही पोटनिवडणूक जिंकावी लागेल. त्याचवेळी दोन उमेदवारांच्या मृत्यूनंतर जंगीपूर आणि शमसेरगंजमधील निवडणुका एप्रिलमध्ये रद्द कराव्या लागल्या होत्या.
  भवानीपूरमध्ये बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपच्या प्रियंका टिबरेवाल रिंगणात आहेत, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (CPI-M) ने श्रीजीब बिस्वास यांना तिकीट देण्यात आलं आहे. भवानीपूरमध्ये सर्वात कमी मतदान निवडणूक आयोगाच्या मते, भवानीपूरमध्ये 53.32 टक्के मतदान झाले. याशिवाय मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरमध्ये 76.12 टक्के लोकांनी, तर शमशेरगंजमध्ये 78.60 टक्के लोकांनी मतदान केलं. सर्वात कमी मतदान भवानीपूरमध्ये झालं आहे. हेही वाचा- वडिलांच्या फोटोला हार चढवतानाच आला हार्ट अटॅक; माजी आमदार Veerapandi A Raja यांचा वाढदिवशीच मृत्यू ममता यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कारण ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणं आवश्यक आहे. तरच त्या मुख्यमंत्री पदावर राहू शकतील. मतमोजणी पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्था मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय दलाच्या 24 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य पोलिसांना देखील सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Kolkata, Mamata banerjee, West bengal

  पुढील बातम्या