नवी दिल्ली, 28 मे : लॉकडाऊनमध्ये दारू घेण्यासाठी उडालेली झुंबड पाहता केरळच्या सरकारने एक ऑनलाइन ऑर्डर करण्याचं अॅप्लिकेशन विकसित केलं. हे BevQ अॅप Google Play Store वर लाईव्ह झाल्यानंतर 2 लाख लोकांनी ते डाउनलोड केलं आहे. सोबतच त्यावर नोंदणी देखील केली. बेव्हक्यू हे एक व्हर्च्युअल क्यू सिस्टमसाठीचं App आहे . केरळमधील मद्य दुकानांच्या समोर गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलं आहे. केरळमधील ज्या कंपनीने दारू बुक करण्यासाठी हा अॅप विकसित केलं आहे त्याचं नाव फेअरकोड टेक्नोलॉजीज आहे. काल सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेत पहिल्या दोन तासांत अंदाजे 1 लाख 82 हजार लोकांनी App वर नोंदणी केली. कसं चालतं App चं काम सुमारे 50 हजार युजर्स आज गुरुवारी दुपारी 2 ते साडेतीन वाजेपर्यंत जोडले गेले आहेत. अॅप गुगल प्ले स्टोअरमध्ये आहे. पण याचा कारभार लाईव्ह आहे. प्ले स्टोअरमध्ये ‘केरळ राज्य पेय पदार्थ निगम’ वापरून हे अॅप शोधता येतं. ओटीपी पाठविताच, नावावर आणि पोस्टकोडवर नोंदणी केली जाते. त्यानंतर, ग्राहकाने मद्य निवडून त्याची ऑर्डर देता येतं. अॅप स्टोअरला टाइम स्लॉट आणि एक क्यूआर कोड आहे. ग्राहकाने दारूच्या दुकानात जाऊन एक ई-टोकन तयार करावा लागतो, जो दारू विक्रीपूर्वी दारूच्या दुकानात स्कॅन केला जाईल. अन्य बातम्या कोरोना विरोधात या 9 औषधांची भारतात केली जातेय चाचणी, काय आहेत त्यांची नावं? तिसऱ्या मजल्यावरून लटकत होता 3 वर्षांचा चिमुरडा, तेवढ्यात आला डिलिव्हरी बॉय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.