Home /News /maharashtra /

साताऱ्यात गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांच्या नावाच्या पाट्या

साताऱ्यात गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांच्या नावाच्या पाट्या

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

    सातारा,16 जानेवारी: शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांचे निषेध आंदोलन सुरू केले आहे. उदयनराजे भोसले यांचे समर्थकांनी गुरुवारी सातारा बंदची हाक दिली आहे. पोवई नाका चौकात गाढवांची धिंड काढून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, आज पुण्यात दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला. उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजपचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. शरद पवारांना आम्ही जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला. संजय राऊतांचा उदयनराजेंवर पुन्हा हल्लाबोल छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या लोकसभेतील पराभवावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून थेट भाजपलाच धारेवर धरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला. तसंच लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचा झाले पराभव हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची आणि महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल उपस्थितीत केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव करून चांगलाच धक्का दिला होता. उदयनराजेंसाठी शिवेंद्रराजे आले धावून छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरुन मोठा वादंग निर्माण झाला. आता या वादात शिवेंद्रराजेंनी उडी घेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे हे छत्रपतींचे वंशज आहेत हे पुरावे द्यावे अशा प्रकारचे भाष्य केले होते. याला प्रतिउत्तर म्हणून भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संजय राऊत यांचा वर निशाणा साधत हा वाद संजय राऊत यांनी तयार केला आहे, तो त्यांनीच संपवावा, असं आवाहन केलं आहे. तसंच, 'अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही कोणत्या घराण्यात जन्माला आलो आहोत त्यांना कोणता पुरावा पाहिजे तो त्यांनी सांगावा आणि संजय राऊत यांनी भाषा शैली नीट वापरावी असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. उदयनराजेंची शिवसेनेवर टीका दरम्यान, मंगळवारी उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन सेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं, महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आली होती का? अशा शब्दात उदयनराजेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही. महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितलं आहे. उदयनराजेंची शरद पवारांवर टीका भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल, असे कुणी नाही, असेही उदयनराजे म्हणाले होते. उदयनराजे म्हणाले, कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते, असे सांगत लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Jitendra avahad, Maharashtra news, Satara news, Udayan raje bhosle

    पुढील बातम्या