बेंगळुरू, 30 जानेवारी: उत्तर प्रदेशमधील अयोध्या (Ayodhya) याठिकाणी रामाचं भव्य मंदिर आकार घेत आहे. या मंदिर निर्माणासाठी निधी गोळा करणाऱ्या तिघांवर कर्नाटकची राजधानी बेंगळुरू याठिकाणी हल्ला झाल्याची घटना घटना घडली आहे. हिंदू संघटनेच्या या तीन व्यक्तींवर हल्ला झाला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की देणगी गोळा करण्यासाठी ते त्यांच्या गाडीतून गुरप्पनापाल्या याठिकाणी निघाले होते. त्याच्या गाडीवर रामाचं पोस्टर देखील होतं. जेव्हा एकाठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी त्यांच्या गाड्या थांबल्या त्यावेळी काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती, या व्यक्तींनी दिली आहे.
या संघटनेच्या एका सदस्याने अशी माहिती दिली की, त्याठिकाणी स्थानिकांपैकी 4-5 लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली आणि दोन्हीकडून दगडफेक होऊ लागली. इतर काही स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. बेंगलुरु साउथ BJP चे महासचिव व्ही सुदर्शन यांनी न्यूज18 शी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की, आम्ही गेल्या 15 दिवसांपासून निधी गोळा करत आहोत. आता या घटनेनंतर आमचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसांत तक्रार केल्याची देखील माहिती दिली.
(हे वाचा-Delhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले)
सुदर्शन यांनी अशी माहिती दिली आहे की, त्यांनी पोलिसांना असे म्हटले आहे जर 24 तासांच्या आतमध्ये हल्लेखोरांना अटक नाही झाली तर ते पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करतील. त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवून देऊ अशी देखील माहिती दिली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 40-50 अज्ञात व्यक्तींवर एफआयआर दाखल केला आहे.
(हे वाचा-महाराष्ट्रातले काँग्रेसचे मंत्री दिल्लीत, हायकमांडने तातडीने बोलावलं)
देशभरातून राम मंदिराच्या निर्माणासाठी विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते देणगी गोळा करत आहेत. अनेक नेतेमंडळी, व्यावसायिक, उद्योजक यांनी देखील याकरता निधी देऊ केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील पाच लाखांची देणगी राम मंदिरासाठी देऊ केली होती. विविध राज्यांची मुख्यमंत्र्यांनी देखील आर्थिक साहाय्य पाठवले आहे. शिवाय अनेक संस्थांनी या कामात निधी गोळा करण्याचा पुढाकार घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.