मराठी बातम्या /बातम्या /देश /Delhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले

Delhi Blast : इस्रायल दूतवासाजवळ सापडलं बंद पाकीट, दोन संशयीत CCTV मध्ये दिसले

मध्य दिल्लीतील इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. या पथकाला घटनास्थळी इस्लायल ऍम्बसीचा (Israel Embassy)  पत्ता असलेलं एक बंद पाकीट सापडलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 जानेवारी : मध्य दिल्लीतील इस्रायली दूतवासाबाहेर शुक्रवारी कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या स्फोटाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाला बोलावण्यात आलं आहे. या पथकाला घटनास्थळी इस्लायल ऍम्बसीचा (Israel Embassy)  पत्ता असलेलं एक बंद पाकीट सापडलं आहे. या पाकिटावर इस्रायलच्या दूतवासातील एका अधिकाऱ्याबाबत मजकूर लिहिलेला आहे. या पाकिटाचा आणि त्याच्यावरच्या मजकुराचा बॉम्बस्फोटाशी संबंध आहे का, याचा तपास विशेष पथक करत आहे. या पत्रासोबतच पोलिसांनी बॉम्बस्फोटासाठी वापरलेले बॉल बेअरिंगही जप्त केले आहेत.

दरम्यान या स्फोटावेळची सीसीटीव्ही दृष्य पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या फूटेजमध्ये एका टॅक्सीतून दोन जण खाली उतरून घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर ही टॅक्सी रवाना झाली. हे दोघंही संशयीत स्फोट घडवण्यासाठी चालत तिकडे गेले होते. पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली आहे. बॉम्ब लावल्यानंतर दोन्ही संशयीत तिकडून पळून गेले आहेत.

दहशत पसरवण्यासाठी हा बॉम्बस्फोट करण्यात आल्याचा विशेष पथकाचा प्राथमिक अंदाज आहे. पथकाला सीसीटीव्हीमध्ये एक संशयास्पद कारही दिसली आहेर. तसंच स्फोट झाला त्यावेली परिसरात किती मोबाईल कार्यरत होते, याची माहिती घेण्यासाठी डम्प डेटाही घेतला जात आहे.

First published:

Tags: Delhi Blast