अमेरिकेत वाघिणीला कोरोना, भारताने घेतला हा मोठा निर्णय

अमेरिकेत वाघिणीला कोरोना, भारताने घेतला हा मोठा निर्णय

चीनमध्ये प्राण्यांपासून माणसांमध्ये कोरोना आल्याचं सांगितलं जातं. आता माणसांमुळे तो प्राण्यांमध्ये पसरत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 06 एप्रिल : जगभर धुमाकळ घालणाऱ्या कोरोनाचं आता नवं रूप समोर आलं आहे. न्यूयॉर्कच्या एका प्राणी संग्रहातल्या वघिणीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे जगभर पुन्हा चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेतलं प्रकरण समोर आल्यानंतर भारताने तातडीने निर्णय घेत राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पाला भेटी देण्यावर पूर्ण बंदी टाकली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्यांना एक महत्त्वाचं पत्र लिहिलं असून त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

चीनमध्ये प्राण्यांपासून माणसांमध्ये कोरोना आल्याचं सांगितलं जातं. आता माणसांमुळे तो प्राण्यांमध्ये पसरत आहे. त्यामुळे भारताने तातडीने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 10 मार्गदर्शन सूचना केंद्राने केल्या असून त्यावर तातडीने अंमलबजावणी करावी असं सांगितलं आहे.

वन्य प्राण्यांना जर कोरोना झाला तर त्याला रोखणं हे आणखी कठीण काम असणार आहे. त्यामुळे संबंधितसर्व क्षेत्र हे माणसांच्या सहवासापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात वाघिण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेच्या विभागानुसार प्राण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही पहिली घटना आहे. ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचा-याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघही त्याच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना झाला.

वाचा- क्वारंटाइन व्यक्तींच्या त्या VIDEOची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल, मागितली माफी

अमेरिकेत सध्या 3 लाख 36 हजार 958 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे 9 हजार 626 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त रुग्ण हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे.

वाचा-10 जूनपर्यंत असणार लॉकडाउन? WHOच्या व्हायरल वेळापत्रकामागचे हे आहे सत्य

न्यूयॉर्कमधील हे प्राणीसंग्रहालय 16 मार्चपासून बंद आहे. ज्या वाघिणीला कोरोना झाला आहे तीचे नाव नादिया असून, काही दिवसांपूर्वी तिची चाचणी करण्यात आली होती. यात नादिया कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यामुळं आता इतर 5 सिंह आणि वाघांचे नमुने घेण्यात आले आहेत, इतर प्राणीसंग्रहालयातील सिंहामध्ये ही लक्षणे दिसत आहेत. प्राणिसंग्रहालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारावर वाघांची बहीण अजूल, अमूर टायगर्स आणि 3 आफ्रिकन सिंहांना कोरडा खोकला आला होता आणि लवकरच बरे होण्याची शक्यता आहे. तथापि, त्याची लक्षणे इतर प्राण्यांमध्ये दर्शविली गेली नाहीत.

First published: April 6, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या