बरेली, 5 मे : एका महिलेने पतीच्या टोमण्यांना आणि मारहाणीला वैतागून पतीला चांगलीच अद्दल घडवली आहे. ही महिला मुकी असून तिला तिचा पती याबद्दल टोमणे देत असे. अशाच प्रकारे पतीच्या बोलण्यामुळे राग अनावर होऊन पत्नीने त्याची जीभच चावली. यामुळे पतीला रक्तस्राव सुरू झाला. त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना बुधवारी रात्री घडली. पत्नीने उचलेल्या या पावलामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. बायकोला बोलता येत नाही म्हणून टोमणे मारायचा नवरा जखमी झालेल्या पतीचं नाव श्रीपाल मौर्य असून तो मजूर आहे. वर्षभरापूर्वी त्याचं बिहारमधील एका महिलेशी लग्न झालं होतं. महिला मूक असल्यानं तिला बोलता येत नाही, फक्त ऐकू येतं. बोलण्याऐवजी ती हातवारे करून तिचा मुद्दा समजावून सांगत असे. श्रीपाल पत्नीला बोलता येत नसल्याने अनेकदा टोमणे मारायचा. तो दररोज पत्नीला मारहाण करायचा. ही महिला टोमणे आणि मारहाणीला कंटाळली होती, असं सांगण्यात येत आहे. हे वाचा - वाजत-गाजत वरात आली पण..; वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यानच नवरीने दिला लग्नास नकार पतीने शिवीगाळ सुरू केल्यावर पत्नीला राग आला बरेलीमध्ये राहणारा श्रीपाल बुधवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि थकल्यामुळे तो झोपू लागला, असं सांगण्यात येत आहे. इतक्यात त्यांच्या पत्नीने जेवण आणून पतीला जेवायला बोलावायला सुरुवात केली. पण जेवण्याऐवजी श्रीपालने तिला शिवीगाळ केली आणि तिला पुन्हा काही बोलता येत नाही असा टोमणा मारला. त्यामुळे या महिलेला इतका राग आला की, तिने श्रीपालवर अंगावर धावून जात दातांनी त्याची जीभ जोरात चावली. श्रीपालची जीभ पूर्ण ताकदीने चावल्यामुळे त्याला रक्तस्त्राव होऊ लागला. त्याने आरडाओरड केल्याने घरातील लोक जमा झाले. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे वाचा - पाक बॉर्डरवरील भुयाराचे Photo आले समोर, 265 फूट ऑक्सिजन पाईपही सापडला महिलेने हावभाव करतच हा सगळा प्रकार सांगितला श्रीपालची जीभ कापल्यानंतर महिलेने सर्व प्रकार लोकांना सांगितला. टोमणे ऐकून आणि मारहाणीला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचं हावभाव करूनच सांगितलं. आतापर्यंत श्रीपालच्या कुटुंबीयांनी पत्नीवर कोणतीही पोलीस कारवाई केली नसली तरी तिनं उचललेल्या या पावलामुळे सर्वच जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.