मराठी बातम्या /बातम्या /देश /चीन सीमेवर तणाव असतांनाच जवानांना मिळणार ‘भाभा कवच’, शत्रूंच्या गोळ्यांचाही होणार नाही परिणाम

चीन सीमेवर तणाव असतांनाच जवानांना मिळणार ‘भाभा कवच’, शत्रूंच्या गोळ्यांचाही होणार नाही परिणाम

हैदराबादच्या Mishra Dhatu Nigam Limited (MIDHANI)मध्ये हे कवच तयार होणार आहे.

हैदराबादच्या Mishra Dhatu Nigam Limited (MIDHANI)मध्ये हे कवच तयार होणार आहे.

हैदराबादच्या Mishra Dhatu Nigam Limited (MIDHANI)मध्ये हे कवच तयार होणार आहे.

नवी दिल्ली 13 सप्टेंबर: चीन सीमेवर तणाव असतांनाच आता भारतीय लष्करासाठी एक चांगली बातमी आली आहे. जवानांचं संरक्षण व्हावं यासाठी Bhabha Atomic Research Centre(BARC) ने बुलेटप्रुफ ड्रेस तयार केला आहे.  'भाभा कवच' (Bhabha Kawach) असं नाव त्याला देण्यात आलं असून हैदराबादमध्ये त्याचं उत्पादन केलं जाणार आहे.

हैदराबादच्या Mishra Dhatu Nigam Limited (MIDHANI)मध्ये हे कवच तयार होणार आहे. सैनिकांसाठी हा पूर्ण पोशाखच असून गोळ्यांच्या माऱ्यापासून त्यांचं संरक्षण होणार आहे. हे कवच एवढं मजबूत आहे की AK-47सारख्या अत्याधुनिक रायफलच्या गोळ्यांपासूनही त्याचा बचाव होणार आहे. वेगवान गोळ्याही त्यांना भेदून जाऊ शकणार नाहीत.

हे कवच खास धातूपासून तयार करण्यात आलं आहे. जागतिक दर्जाचं हे कवच असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेऊनच त्याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती MIDHANIचे संचालक संजय कुमार झा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलतांना दिली.

फक्त सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाच नाही तर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या काश्मीरमधल्या जवानांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.

तुरुंगातून पळाले कैदी, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी हाफ पँटमध्येच घेतली धाव

सीमेवर निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनची (India-China Standoff) दोन स्तरावर चर्चा सुरू आहे. राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. मात्र सीमेवर चिनी सैन्याचा मुजोरपणा सुरूच असून आता फिंगर- 3 भागात चिनी सैन्याने जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तणाव कमी व्हावा असं चीनलाच वाटत नसल्याचं स्पष्ट होतेय असं तज्ज्ञांचं मत आहे.

रशियाची राजधानी मॉस्को इथं झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे त्यांच्या समकक्ष चिनी मंत्र्यांना भेटले.

धक्कादायक! NEET परीक्षेआधी तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

सीमेवरच्या तणावानंतर सर्वोच्च पातळीवर झालेल्या या चर्चा होत्या. सीमेवर तणाव वाढू नये, शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळणार नाही यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं.

First published:
top videos

    Tags: Indian army