बिहारमध्ये एक विचित्र प्रकार घडला. एक आरोपी तुरुंगातून पळून गेला. त्याला पकडताना पोलीस गोंधळून गेले. कैदी पळाल्याची बातमी कळताच पोलीस ठाण्यात खळबळ उडाली.
2/ 6
कपडे न घालताच पोलीस आरोपीला पकडण्यााठी धावू लागले, कैद्याला पकडण्यासाठी धावले. सुमारे 1 किमी पाठलाग केल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश आले. फोटो: न्यूज 18
3/ 6
बिहारमधील एका गावात काही गुन्हेगारांनी धमकावून एका युवकाकडून 19 हजार हिसकावले. बंगालमधील रहिवाशाला लुटल्यानंतर त्यांनं पोलिसात तक्रार केली. फोटो: न्यूज 18
4/ 6
पीडित युवकाने याबाबत देल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि तिन्ही आरोपींना पकडले. शनिवारी या उपद्रव्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू असताना त्यातील एक जण पोलीस स्टेशनच्या खिडकीतून पळाला. फोटो: न्यूज 18
5/ 6
मुख्य म्हणजे पोलिस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याची माहितीही त्या पीडिते तरुणाला झाली. तोच आरोपीला पकडण्यासाठी धावू लागला. त्यानंतर पोलिसही आरोपीच्या मागे धावले. तरूणाने धाव घेत आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. फोटो: न्यूज 18
6/ 6
पोलिसांनी सांगितले की, या युवकाला 19 हजार रुपये लुबाडल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्यांना कोर्टात घेऊन जात असताना एक आरोपी पळाला. पोलिसांनी पुन्हा आरोपीला पकडले आहे. आता सर्वांना कोर्टात हजर केले जाईल. फोटो: न्यूज 18