अनिरुद्ध शुक्ला, प्रतिनिधी बाराबंकी, 5 जुलै : आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे जरा हायसं वाटतं. नाहीतर गेले काही महिने उकाड्याने जीव नुसता हैराण व्हायचा. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात तर चक्क प्रसूतीसाठी एसी रूम (वातानुकुलीत खोली) बुक केला नाही म्हणून माहेरच्यांकडून मुलीच्या सासरच्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सिव्हिल लाईन्स परिसरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये हा प्रकार घडला. नर्सिंग होमबाहेर झालेली तुंबळ हाणामारी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. घरात बाळ जन्माला आलं याचा आनंद साजरा न करता एसी रूमसाठी भांडणारं कुटुंब पहिल्यांदाच पाहिलं, अशी चर्चा बघ्यांमध्ये रंगली होती.
नेमकं घडलं काय? नगर कोतवाली परिसरातील आवास विकास कॉलनीत राहणारे रामकुमार यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, लखनौ येथे त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं. सून गरोदर असल्याने प्रसूतीसाठी त्यांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. सुनेला मुलगी झाली. प्रसूतीचा सर्व खर्चही सासरच्यांनी केला. मुलीला बघायला सुनेच्या माहेरची मंडळी आली असता त्यांनी रुग्णालयात एसी रूम का बुक केली नाही, असं विचारून सासरच्या मंडळींना शिव्या देण्यास सुरुवात केली. Ajit Pawar : शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजितदादांनी टाकला डाव, शरद पवारांचं अध्यक्षपदच धोक्यात? दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली. भांडण मारामारीपर्यंत गेलं. माहेरच्या मंडळींनी सासू, सासरा आणि दोन नणंदांना मारहाण केली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले असून सुनेच्या माहेरच्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी रामकुमारने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या सगळ्यात नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला मोठा मनस्ताप सहन करावा लागला.