मराठी बातम्या /बातम्या /देश /दोन दिवस बँका बंद राहणार, SBI च्या विनंतीनंतरही कर्मचारी संपावर ठाम

दोन दिवस बँका बंद राहणार, SBI च्या विनंतीनंतरही कर्मचारी संपावर ठाम

Bank Strike

Bank Strike

देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप पुकारणार आहेत. या संपामुळे (Public Sector Bank)दोन दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे.

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: उद्या आणि परवा म्हणजेच 16 आणि 17 डिसेंबरला देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका (Public Sector Bank) बंद राहणार आहेत. कारण त्यांचे कर्मचारी दोन दिवसीय देशव्यापी संपावर (nationwide strike)जाणार आहेत. एसबीआयसह इतर बँकांनी कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कर्मचारी संघटना आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. हा संप बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून आपल्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. बँकेने म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे संबंधितांना मोठा त्रास होऊ शकतो. एसबीआयने बँक युनियनला चर्चेसाठी आमंत्रणही पाठवले आहे.

त्याच वेळी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने देखील आपल्या कर्मचारी आणि युनियनना पत्र लिहून त्यांच्या सदस्यांना बँकेच्या भल्यासाठी काम करण्यास सांगितले. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ट्विटद्वारे कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहनही केले आहे.

बॅंकांचे व्यवस्थापक बॅंक संघटना आणि बॅंक युनियनच्या सतत संपर्कात असल्याचे विविध माध्यमांच्या वृत्तांतून दिसून आले आहे. हा संप मागे घेण्याबाबत ते सातत्याने बोलत आहेत. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, सोमवारी लोकसभेत खासगीकरणाच्या मंत्रिमंडळ समितीवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ज्या दोन बँकांचे खासगीकरण करायचे आहे, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात, सरकारने म्हटले आहे की 2021-22 च्या अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे (PSB) खाजगीकरण आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीच्या धोरणाला वर्षभरात मान्यता द्यावी लागेल. बँकेची निवड यासह निर्गुंतवणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांचा विचार या उद्देशासाठी नियुक्त केलेल्या कॅबिनेट समितीकडे सोपवण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणासाठी संबंधित मंत्रिमंडळ समितीने या संदर्भातील निर्णय घेतलेला नाही.

First published:

Tags: Bank strike, SBI