मराठी बातम्या /बातम्या /देश /

पतीला Porn Video बघायचं लागलं होतं व्यसन, पत्नीनं अडवताच सुरुवात केली छळवणूक करण्यास

पतीला Porn Video बघायचं लागलं होतं व्यसन, पत्नीनं अडवताच सुरुवात केली छळवणूक करण्यास

एका महिलेनं तिच्या पतीवर पॉर्न व्हिडिओ (Porn Video)पाहण्याचं व्यसन असल्याचा आरोप केला आहे.

एका महिलेनं तिच्या पतीवर पॉर्न व्हिडिओ (Porn Video)पाहण्याचं व्यसन असल्याचा आरोप केला आहे.

एका महिलेनं तिच्या पतीवर पॉर्न व्हिडिओ (Porn Video)पाहण्याचं व्यसन असल्याचा आरोप केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

बेंगळुरु, 03 नोव्हेंबर: कर्नाटकातील (Karnataka) बेंगळुरूमध्ये (Bengaluru)महिलांच्या छेडछाडीची (Woman Harassment) धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेनं तिच्या पतीवर पॉर्न व्हिडिओ (Porn Video)पाहण्याचं व्यसन असल्याचा आरोप केला आहे. जेव्हा पत्नीनं पतीच्या या व्यसनालाविरोध केला असता त्यानं तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला कुजलेलं अन्न खाण्यास भाग पाडलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरू येथील एका 36 वर्षीय पीडित महिलेनं तिच्या पतीविरुद्ध प्रथम अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टात दिलेल्या तक्रारीत महिलेनं 11 नोव्हेंबर 2019 रोजी लग्न झाल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा- Talibanला जोरदार फटका, आत्मघाती हल्ल्यात मारला गेला मोठा कमांडर

लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांकडून दोन लाख रुपये रोख रक्कम आणि एक लाख रुपये सोन्याचा हुंडा घेतल्याचा आरोप तिनं केला आहे. लग्नानंतर लगेचच तिला समजलं की, तिच्या पतीला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची सवय आहे. महिलेनं आरोप केला आहे की, तिचा नवरा रात्री कॉल गर्ल्सशी बोलतो.

तिनं तक्रारीत म्हटलं आहे की, तिने पतीच्या कृतीला विरोध केला असता त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पतीचे कुटुंबीय त्याला साथ देत होते. पती कुटुंबीय तिला कुजलेले अन्न खायला बळजबरी करायचे. त्याचबरोबर कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात नेणेही त्यांनी बंद केलं होतं.

हेही वाचा- T20 World Cup 2021: भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी राशिद खानचं फॅन्सना कळकळीचं आवाहन, म्हणाला...VIDEO 

महिलेच्या या तक्रारीवरून कोर्टानं बसवनगुडी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

First published:

Tags: Bengaluru, Porn video