मुंबई, 3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात बुधवारी टी20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाचा सामना होणार आहे. अबु धाबीच्या शेख झायद स्टेडियममध्ये होणारा हा सामना दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा आहे. विशेषत: या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) दमदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फॅन्समध्ये तर या मॅचमुळे चांगलाच उत्साह आहे.
अफगाणिस्तानच्या फॅन्समध्ये या मॅचची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे ते मोठ्या संख्येनं ही मॅच पाहयला येणार आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान (Afghanistan vs Pakistan) मॅचमध्येही फॅन्स मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्या मॅचमध्ये तर अनेकांनी तिकीट नसतानाही बळजबरीनं स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकारानंतर अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खाननं (Rashid Khan) फॅन्सना कळकळीचं आवाहान केलं आहे.
राशिदनं एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत त्यांनी फॅन्सना तिकीटं खरेदी करुनच स्टेडियममध्ये प्रवेश करावा असं आवाहन केलं आहे. 'भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचसाठी मी उत्साहित आहे. पण गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनांमुळे मी निराश झालो आहे. मला आपला राष्ट्रीय ध्वज उंच करण्यासाठी आणि आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कृपया नियमांचं पालन करा आणि तिकीटं खरेदी करुनत स्टेडियममध्ये या' असं आवाहान राशिदनं केलं आहे.
I’m super excited about tomorrow’s AFGvIND game. I was disappointed at the scenes last weekend; we need to fly our national flag 🇦🇫 high & do our country proud. Pls respect rules & support the organisers @ICC @T20WorldCup @AbuDhabiCricket, only coming to the stadium with a ticket pic.twitter.com/GXsf1vSoiR
— Rashid Khan (@rashidkhan_19) November 2, 2021
काय घडला होता प्रकार?
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांची मॅच शुक्रवारी झाली. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता मॅच होणार होती. मात्र दुपारपासूनच दोन्ही देशांचे फॅन्स स्टेडियममध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली होती. काही फॅन्स तिकीट न घेताच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्यात जोरदार मारामारी (Pakistan Afghanistan fans Scuffle In Dubai Stadium) झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या क्रिकेट फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामध्ये कुणी स्टेडियमवरील छतावर चढले तर कुणी मारामारी केली. त्यामुळे मॅचची तिकीटं खरेदी केलेल्या काही जणांना स्टेडियममध्ये जाता आलं नाही.' आयसीसीनं या सर्व प्रकराबद्दल नंतर माफी मागितली आहे.
PAK vs AFG: क्रिकेट फॅन्समध्ये जोरदार मारामारी, लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवले! पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Cricket, T20 world cup