बालासोर, 04 जून : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बालासोर दुर्घटना प्रकरणी माहिती देताना अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदलामुळे झाल्याचं म्हटलंय. या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. घटनेची कारणेही समोर आली आहेत. अश्विन वैष्णव यांनी अपघाताचे मूळ कारण इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल असल्याचं म्हटलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कवच प्रणाली नसल्यावरून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना रेल्वे मंत्री म्हणाले की, दुर्घटनेचा कवच प्रणालीशी संबंध नाही. तो पूर्ण वेगळा मुद्दा आहे. यामध्ये पॉइंट मशीन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यांचा सामावेश आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगवेळी जो बदल झाला त्यामुळे हा अपघात घडला. कुणी केलं आणि कसं घडलं याची माहिती चौकशीनंतर मिळेल. Train Accident : बालासोर दुर्घटना कशामुळे घडली? रेल्वेमंत्र्यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण इंटरलॉकिंग ही एक सिस्टिम सुरक्षा टेक्नॉलॉजी आहे. रेल्वे जंक्शन, स्टेशन आणि सिग्नलिंग पॉइंटवर ट्रेनच्या सुरक्षित वाहतुकीत याची भूमिका महत्त्वाची असते. सर्वसामान्यपणे सिग्नल, पॉइंट आणि ट्रॅक सर्किट यांचा समावेश असतो. इंटरलॉइंक सिस्टिममुळे पॉइंट-ट्रॅकचा हलणारा भाग जो ट्रेनला एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी परवानगी देतो. तसंच ट्रेन त्यावरून जाण्याआधी लॉक असतो. ट्रॅक सर्किट ट्रॅकवर विद्युत सर्किट असते जे ट्रेन आहे की नाही याची माहिती देतो. ट्रॅकचा भाग भरलेला आहे की रिकामा हे यामुळे समजते. इंटरलॉकिंग सिस्टिमला त्यानुसार ट्रेनच्या हालचाली नियंत्रित करण्यास सक्षम बनवते. इंटरलॉकिंग सिस्टिम सिग्नल पॉइंट आणि ट्रॅक सर्किटच्या स्थितीवर लक्ष ठेवते. तसंच धोकादायक स्थिती रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. इंटरलॉकिंग टेक्नॉलॉजीचे एक आधुनिक रूप आहे. यामध्ये सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांच्या माध्यमातून ट्रेनच्या वाहतुकीवर नियंत्रण राखले जाते. सिग्नलिंग, पॉइंट आणि ट्रॅक सर्किटला रोखणं आणि चालू करण्यासाठी कम्प्युटर, प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोल आणि नेटवर्कचा वापर केला जातो. सर्वात सेफ ट्रेन, तरी इतके जीव कसे गेले? रेल्वे बोर्डाने केला खुलासा उच्च स्तरीय चौकशीतून सत्य समोर येणार इलेक्ट्रॉनिंक इंटरलॉकिंगमध्ये बदल, चुकीचा सिग्नल किंवा रूटिंग यामुळे कोरोमंडल एक्सप्रेस मेन लाइनवरून दूर गेली असावी असा अंदाज रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला होता. १२० पेक्षा जास्त वेगाने धावणारी ट्रेन लूप लाइनवर किंवा साइड स्ट्रॅकवर गेली ज्यामुळे उभा असणाऱ्या मालगाडीला धडकली. दुर्घटनेचं योग्य कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.