शिया बोर्डानं अशी काय याचिका केली होती जी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

शिया बोर्डानं अशी काय याचिका केली होती जी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत शिया वक्फ बोर्डाकडून नाराजीचा सूर.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: Ayodhya Case अयोध्या प्रकरणी आलेल्या निकालाबाबत शिया वक्फ बोर्डाची मात्र नाराजी झाली. सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका निकालाचं वाचन सुरू होण्याआधीच फेटाळली. मीर बाकी शिया वक्फ यांची आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत शियाने तयार केलेली मशीदीची जागा सुन्नीला देऊ शकत नाहीत असा दावा शिया वक्फच्या वकील अश्विनी उपाध्याय यांनी केला होता.त्यामुळे वादग्रस्त जागेवर आमचा हक्क आहे असा दावाही त्यांनी कोर्टात केला होता.इमाम-ए हिंद म्हणजे रामाचं भव्य राम मंदिर व्हावं ज्यामुळे हिंदू मुस्लीम एकतेचं प्रतीक मानलं जाईल असाही दावा कोर्टात सादर करण्यात आला होता.

शिया वक्फ बोर्डाचा काय होता दावा

शिय़ा वक्फ बोर्डाचे चेअरमन सैय्यद वसीम रिजवी यांनी साक्षीदारांच्या आधारावर बाबरी मशीद शिया वक्फ यांच्या अधीन असल्याचं म्हटलं होतं. मागील 71 वर्ष शिया वक्फ बोर्डाकडून याबाबत कोणताही दावा करण्यात आला नाही ही बाबही खरी असल्याचं ते म्हणाले. राम मंदिर आणि मशीद एकाच जागी उभी केली तर समुदायिक वाद वाढण्याची संभावना आहे. त्यामुळे मतभेद आणि वाद टाळण्य़ासाठी वादग्रस्त जमीनीवर राम मंदिरापासून काही अंतरावर मशीद उभी करावं. ज्यामुळे दोघांमधील सलोखा कायम राहिल आणि वाद होणार नाहीत.

सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचे सांगत या जागेवर मंदिर उभारण्यासाठी येत्या 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत कऱण्यात आलं आहे.मशीदीसाठी पर्यायी 5 एकर जागा देण्यात येणार असा निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी आणि शहरांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले असून पोलिसांची अधिक कूमक तैनात करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल ; LIVE UPDATE

जमीन संपादनाआधी तिथं मुस्लीम नमाज पढत होते- कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा विचार करण्यासारखा- कोर्ट

मंदिर पाडून मशीद बनवल्याचा उल्लेख नाही- कोर्ट

एका रात्री मूर्ती ठेवली असा मुस्लिम पक्षाचा दावा- कोर्ट

1949मध्ये दोन मूर्ती ठेवण्यात आल्या-कोर्ट

आधीचं बांधकाम गैरइस्लामिक होतं- कोर्ट

मोकळ्या जागेवर मशीद बांधली गेली नव्हती- कोर्ट

निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला

राममंदिरासाठी 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करा- कोर्ट

वादग्रस्त जागा रामलल्लाचीच -कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा द्यावी - कोर्ट

वादग्रस्त जागा हिंदूंना मिळणार-कोर्ट

काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना जमीन मिळेल

मुस्लिमांना पर्यायी जागा देणार - कोर्ट

हिंदू पक्षानं बाहेरच्या जागेवर दावा सिद्ध केला - कोर्ट

प्राचीन यात्रेकरूंनी रामजन्मभूमीचा उल्लेख केलाय- कोर्ट

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील वकिलांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

Published by: Kranti Kanetkar
First published: November 9, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading