जाहिरात
मराठी बातम्या / देश / Ayodhya Masjid: '..म्हणून मशिदीसाठी केवळ 20 लाखच जमा', नाराज अन्सारींचा मोठा आरोप

Ayodhya Masjid: '..म्हणून मशिदीसाठी केवळ 20 लाखच जमा', नाराज अन्सारींचा मोठा आरोप

Ayodhya Masjid: '..म्हणून मशिदीसाठी केवळ 20 लाखच जमा', नाराज अन्सारींचा मोठा आरोप

अयोध्येतील मशिद निर्मितीसाठी (Ayodhya Mosque) गोळा केलेल्या पैशांच्या प्रश्नावरुन बाबरी मशिदीची माजी फिर्यादी इक्बाल अन्सारी (Iqbal Ansari)यांनी इंडो इस्लामिक कल्चर फाऊंडेशन ट्रस्टचे (IICF) अध्यक्षांवर मोठा आरोप केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अयोध्या, 7 एप्रिल: अयोध्येतील मशिद निर्मितीसाठी (Ayodhya Mosque) गोळा केलेल्या पैशांच्या प्रश्नावरुन बाबरी मशिदीची माजी फिर्यादी इक्बाल अन्सारी (Iqbal Ansari) यांनी इंडो इस्लामिक कल्चर फाऊंडेशन ट्रस्टचे (IICF) अध्यक्षांवर मोठा आरोप केला आहे. हा ट्रस्ट खासगी आहे. त्यामुळे लोकांना या ट्रस्टवर विश्वास नाही, असा आरोप अन्सारी यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिरासोबतच (Ram Mandir, Ayodhya) मशिदीची निर्मिती सुरु झाली आहे. मात्र या मशिदीच्या निर्मितीसाठी इंडो इस्लामिक कल्चर फाऊंडेशन ट्रस्टला 20 लाखांचाच निधी गोळा करता आला आहे. या मुद्यावर अन्सारी यांनी हा मोठा आरोप केला आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील धनीपूरमध्ये मशिदीसाठी 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. वक्फ बोर्डानं फेब्रुवारी 2020 मध्ये इंडो इस्लामिक कल्चर या ट्रस्टची निर्मिती केली आणि बँकेत खातं उघडलं. या ट्रस्टच्या निर्मितीला आता 16 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही मशिदीच्या निर्मितीसाठी 20 लाख रुपयेच जमले आहेत. या मशिदीसोबत हॉस्पिटल, ग्रंथालय, कम्युनिटी किचन आणि संग्रहालय बनवण्याची ट्रस्टची योजना आहे. काय म्हणाले अन्सारी? बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी सांगितले कि, “अयोध्येमध्ये हिंदू, मुस्लीम, शिख आणि ख्रिश्चन या सर्व धर्माचे लोकं राहतात. देश-विदेशातील लोकं अयोध्यामध्ये येतात. आज अयोध्येत राम मंदिराची निर्मिती होत आहे. सर्व जगभरातील लोकं हिंदू असो वा मुस्लीम रामाचा नाव घेतात.  पण अयोध्येतील मशिदीचे ट्रस्टी सांगतात की आजवर 20 लाख रुपयेच आले आहेत. तर राम मंदिरासाठी कोट्यावधी रुपये जमा झाले आहेत. ही सर्व श्रीरामाची कृपा आहे. त्यांच्यावर श्रद्धा असणारे लोकं जगभरात आहेत. ( कोरोना लस ठरतेय संजीवनी, Sanjeevaniच्या लाँचवेळी आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया  ) जफर फारुखी यांनी बनवलेला ट्रस्ट खासगी आहे. हा ट्रस्ट सामाजिक असता तर मशिदीच्या निर्मितीसाठीही भरपूर पैसा आला असता. पण ही लोकं सामाजिक नाहीत. या ट्रस्टमध्ये बदल व्हावा अशी आमची मागणी आहे. ट्रस्टीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत लोकं यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणार नाहीत.” असा दावा अन्सारी यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात