• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • 'देशात 8 कोटी 30 लाख जणांनी घेतला डोस, संजीवनी ठरतेय कोरोना लस', Sanjeevaniच्या लाँचवेळी आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

'देशात 8 कोटी 30 लाख जणांनी घेतला डोस, संजीवनी ठरतेय कोरोना लस', Sanjeevaniच्या लाँचवेळी आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

लसीकरणासंदर्भात जनजागृतीसाठी (Awareness about Vaccination) नेटवर्क18 (Network18) आणि फेडरल बँकच्या संयुक्त विद्यमाने 'संजीवनी - अ शॉट ऑफ लाइफ' (Sanjeevani- A Shot of Life) या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लशीची तुलना रामायणातील संजीवनीशी केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 07 एप्रिल: सध्या देशभर कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) वाढतच चालला आहे. त्यामुळे देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणालाही (Covid 19 Vaccination) वेग देण्यात आला आहे. देशात आतापर्यंत एकूण 8 कोटी 30 लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी दिली. ते लसीकरणासंदर्भात जनजागृतीसाठी (Awareness about Vaccination) नेटवर्क18 (Network18) आणि फेडरल बँकच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'संजीवनी - अ शॉट ऑफ लाइफ' (Sanjeevani- A Shot of Life) या मोहिमेच्या लाँचवेळी बोलत होते. 'आतापर्यंत भारतात 8 कोटी 30 लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. मंगळवारी अवघ्या एका दिवसात 43 लाख जणांना कोरोना लस दिली आहे. हे लसीकरणाच्या मोहिमेचं (Vaccination Drive) हे मोठं यश आहे. जागतिक आरोग्य दिनाचं (World Health Day 2021) औचित्य साधून 'संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ' या मोहीमेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांना लशीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला फेडरल बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR Initiative) अंतर्गत निधी देण्यात आला असून, प्रत्येक भारतीयापर्यंत कोरोना लशीची माहिती पोहोचवणं, हा त्यामागचा उद्देश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना लशीची तुलना रामायणातल्या संजीवनीशी केली आहे. कारण ही लस कोरोना विषाणूपासून लोकांना संरक्षण देत आहे. रामायणात भगवान हनुमानाला मोठा प्रवास करून हिमालयात जाऊन संजीवनी आणावी लागली होती. कोरोना लसही संजीवनीसारखंच काम करत आहे. ही लस मिळवण्यासाठी लोकांना धावपळ करायला लागू नये म्हणून देशभरात हजारो केंद्रांमध्ये मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. (हे वाचा- भारतात येऊन धडकतेय कोरोनाची दुसरी लाट, Sanjeevani Campaign ठरेल देशहिताचे) देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा एक एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. यामध्ये 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतातली लसीकरण मोहीम ही जगातली सर्वांत मोठी मोहीम ठरली आहे. आता या मोहिमेत अन्य वयोगटातील लोकांचाही समावेश करण्याचा विचार सरकार करत आहे. 'संजीवनी - ए शॉट ऑफ लाइफ'या उपक्रमाची सुरुवात बुधवारी (7 एप्रिल रोजी) पंजाबमधील अटारी सीमेवर करण्यात आली आहे. त्यावेळी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना (Rakesh Asthana) उपस्थित होते.
First published: