• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Ayodhya: राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल 1000 कोटी रुपये दान

Ayodhya: राम जन्मभूमी मंदिरासाठी 26 दिवसांत तब्बल 1000 कोटी रुपये दान

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janambhoomi Teerth kshetra Trust) महासचिव चंपत रायने (Champt Rai) यांनी राम मंदिरासाठी (Ram Mandir) सतत दान येत असल्याचं सांगितलं.

 • Share this:
  अयोध्या, 11 फेब्रुवारी : राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Ram Janambhoomi Teerth kshetra Trust) महासचिव चंपत रायने (Champt Rai) यांनी राम मंदिरासाठी (Ram Mandir) सतत दान येत असल्याचं सांगितलं. दान आलेली एकूण रक्कम जवळपास एक हजार कोटी रुपये आहे. 1 लाख 50 हजार लोक धन संग्रह अभियानासाठी जोडले असल्याचंही त्यांनी सांगितलं. चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास 16 फूटांपर्यंत झालं आहे. ज्या लेवलवर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी पूजा केली होती, त्या लेवलपासून 5 मीटर खाली जमिनीचं खोदकाम झालं आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी तीन करार - अशोक सिंघल यांच्या काळात आर्किटेक्ट चंद्रकांत सोनपुरासह 1992 मध्ये एक करार झाला होता, त्यात काही मुद्दे वाढवण्यात आले आहेत. दुसरा करार 70 एकरात मंदिराचा भाग सोडून बाकी उरलेल्या भागाचा विकास करणं आहे. हा भाग विकसित करण्यासाठी टाटा कंसल्टेंसीसह करार झाला आहे. तिसरा करार उरलेल्या भागावर कुठे बिल्डिंग उभारली जाईल, त्याचं वास्तू शास्त्र काय असेल, त्याचं मानचित्र, डिटेलिंग कसं असेल हा करार आहे. हा करार नोएडातील फार्म डिझाइन असोसिएटसह झाला आहे. राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येत आहे. मंदिरासाठी केंद्र सरकार कसलीही आर्थिक मदत करणार नाही आहे. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यात दीड लाख स्वयंसेवक सहभागी होतील, असंही रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितलं होतं. मुख्य मंदिरासाठी एकूण 300 कोटी खर्च तर संपूर्ण परिसर विकास धरुन 1100 कोटी खर्च अपेक्षित आहे. निधी संकलनाच्या दुसऱ्या दिवशीच पैसे बँकेत भरले जाणार आहेत. निधीचा गैरवापर होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असंही स्वामींनी सांगितलं होतं.
  Published by:Karishma
  First published: