मराठी बातम्या /बातम्या /देश /

रिक्षावाल्याचा मोठेपणा, कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केली फ्री ऑटो सर्विस!

रिक्षावाल्याचा मोठेपणा, कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू केली फ्री ऑटो सर्विस!

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकदा रुग्णवाहिका वेळेत पोहचू न शकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात आपात्कालीन परिस्थितीत नि:शुल्क सेवा देण्याचा त्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 एप्रिल : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत प्रत्येक जण स्वत:ला वाचवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे झारखंडच्या रांचीमध्ये एक असा व्यक्ती आहे, जो स्वत:ची पर्वा न करता रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचं काम करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा व्यक्ती या कामासाठी कोणाकडूनही एक रुपयाही घेत नाही. त्याच्या या कामासाठी सर्वच स्तरातून त्याचं कौतुक होत आहे.

रवी असं या व्यक्तीचं नाव असून, त्याने स्वत:च्या ऑटोचा वापर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवण्यासाठी सुरू केला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकदा रुग्णवाहिका वेळेत पोहचू न शकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात आपात्कालीन परिस्थितीत नि:शुल्क सेवा देण्याचा त्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना रवीने सांगितलं की, 15 एप्रिलपासून तो सतत रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत करत आहे. 15 एप्रिल रोजी एका कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणीही तयार नव्हतं, त्यावेळी त्याने रुग्णांना फ्रीमध्ये रुग्णालयात पोहचवण्याचं काम करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

'सर्वात आधी ती महिला कोरोनाग्रस्त असल्याचं मला माहित नव्हतं, परंतु मी तिला रुग्णालयात पोहचवलं, यासाठी कोणतेही पैसे घेतले नाही. त्याचवेळी लक्षात आलं, की असे अनेक लोक आहेत, ज्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणतंही साधन मिळत नाही. त्यावेळी अशा लोकांना जितकी होईल तितकी मदत करण्याचं ठरवलं. मी माझा नंबर सोशल मीडियावर शेअर केला आहे, जेणेकरुन रुग्णालयात जाण्यासाठी मी गरजूंना मदत करू शकेल.'

(वाचा - पत्नीसह स्मशानातच राहून लागलं कुटुंब; मृतदेहांवर अंतिम संस्काराची उचलली जबाबदारी)

मला अनेक कॉल येऊ लागले. अनेकांना मी एखाद्या रुग्णालयाशी जोडलेला आहे असं वाटत होतं, त्यामुळे ते मला ऑक्सिजन, बेडबाबतही विचारणा करत असल्याचं त्याने सांगितलं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे अनेकांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणी तयार नसल्याने, अशा लोकांनी मला कॉल केल्याचंही रवीने सांगितलं.

तसंच केवळ कोरोनाच नाही, तर इतर कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत करणार असल्याचं त्याने सांगितलं.

First published:

Tags: Autorickshaw driver, Ranchi