मराठी बातम्या /बातम्या /देश /ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याने सांगितला गोव्यातील शिक्षिकेचा किस्सा; मोदी झाले खूश! ट्विटरवर म्हणाले..

ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याने सांगितला गोव्यातील शिक्षिकेचा किस्सा; मोदी झाले खूश! ट्विटरवर म्हणाले..

ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याने सांगितला गोव्यातील शिक्षिकेचा किस्सा

ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याने सांगितला गोव्यातील शिक्षिकेचा किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक खास गोष्ट शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 12 मार्च : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 8 मार्चपासून त्यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे व्यापार मंत्री डॉन फॅरेल यांच्या एक किस्सा ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावून गेले. वास्तविक फॅरेलने त्यांच्या एका शिक्षकाची गोष्ट पीएम मोदींना सांगितली होती. ही शिक्षिका गोव्यातून ऑस्ट्रेलियाला गेली होती. हे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंध अधोरेखित करत असल्याचे मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये एका महिलेचा फोटो शेअर करताना पीएम मोदींनी लिहिलंय, की ते ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळासोबत जेवत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह त्यांचे अनेक साथीदार उपस्थित होते. त्यापैकी एक ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फेरेल यांनी पंतप्रधान मोदींना एक मनोरंजक गोष्ट सांगितली. त्यांनी पंतप्रधानांना सांगितले की, श्रीमती एबर्ट नावाच्या शिक्षिका त्यांच्या शाळेच्या दिवसात इयत्ता पहिलीच्या दरम्यान त्यांना शिकवत असत.

फेरेल यांनी सांगितले की श्रीमती एबर्ट यांचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. पंतप्रधानांसोबतच्या चर्चेदरम्यान, डॉनने श्रीमती एबर्ट यांना त्यांच्या शैक्षणिक आधाराचे संपूर्ण श्रेय दिले. एका ट्विटमध्ये या चर्चेचे वर्णन करताना पीएम मोदींनी लिहिले, 'मिसेस एबर्ट, त्यांचे पती आणि त्यांची मुलगी लिओनी, गोव्यातून स्थलांतरित होऊन ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे पोहोचले होते. ही गोष्ट आहे 1950 सालची. तिथे अॅडलेडमधल्या शाळेत शिकवायला सुरुवात केली. त्यांची मुलगी नंतर दक्षिण ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर्सची अध्यक्ष बनली.

वाचा - ठरलं! या मतदारसंघातून आठवले लढवणार निवडणूक; म्हणाले भाजपनं...

याबद्दल आनंद व्यक्त करताना पीएम मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील समृद्ध संस्कृतीला जोडणारी ही छोटीशी गोष्ट ऐकून मला खूप आनंद झाला. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शिक्षकाचा प्रेमाने उल्लेख करते तेव्हा ते ऐकणे तितकेच आनंददायी असते.'

First published:
top videos

    Tags: Australia, Narendra Modi