Home /News /national /

मोठा अपघात टळला; रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब, मुंबईकडे येणारी राजधानी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट

मोठा अपघात टळला; रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब, मुंबईकडे येणारी राजधानी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट

Valsad

Valsad

गुजरातमधील (Gujarat) वलसाड (Valsad) जिल्ह्यातील अतुल रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा खांब मुद्दाम रुळावर टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    वलसाड, 15 जानेवारी: गुजरातमधील (Gujarat) वलसाड (Valsad) जिल्ह्यातील अतुल रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी 7.10 वाजता राजधानी एक्सप्रेस (Rajdhani express train) या सिमेंटच्या खांबाला धडकली. मात्र, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. हा खांब मुद्दाम रुळावर टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून ट्रेन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 7.10 वाजता राजधानी एक्सप्रेस (Rajdhani express train) या सिमेंटच्या खांबाला धडकली. मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, सुरत रेंजचे डीजी, वलसाड पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे राजधानीसह सर्व गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. अतुल रेल्वे स्थानकाच्या तारखुंटाजवळ शुक्रवारी सायंकाळी काही अज्ञातांनी हा खांब उखडून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर टाकल्याचे समजते. दरम्यान, तिथून राजधानी एक्स्प्रेस गेली. ती धडकल्याने सिमेंटचा खांब तुटला. राजधानी एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट मोहम्मद सिद्दीकी यांनी अतुल रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टरला घटनेची माहिती दिली.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Gujarat, Indian railway

    पुढील बातम्या