Home /News /national /

वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, 11 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी

वर्दीसह आईचंही कर्तव्य बजावतेय कोरोना योद्धा, 11 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन करतेय ड्यूटी

पूजासारख्या अनेक महिला आज प्रतिकूल परिस्थितीतही देशसेवेसाठी घराबाहेर राहून ड्यूटी करीत आहेत.

    सासाराम, 24 एप्रिल : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) हाहाकार संपूर्ण देशभरात वाढत आहे. याचा प्रकोप रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही दिवस-रात्र एक करीत आहेत. यातही महिला पोलीस स्वत:ची मुलं, घर, संसार सोडून केवळ आपल्या ड्यूटीवर लक्ष देत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर बिहारमधील एका महिला पोलिसाचे वृत्त समोर आले आहे. ही महिला पोलीस कोरोनाच्या संकटात ड्यूटीसह आईचंही कर्तव्य बजावतेय. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील (Bihar) सासाराम येथील मुख्य चौकात ड्यूटी करणारी पूजा कुमारी बिहार पोलिसात कर्तव्यावर आहे. ही महिला पोलीस दिवसभर भूक, तहान विसरुन भर उन्हात ड्यूटी करते. 11 महिन्यांपूर्वी पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ लहान असल्याने त्याला घरी ठेवता येत नाही. त्यामुळे 11 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन पूजा ड्यूटी करीत आहेत. यावर पूजा म्हणते, बाळाला कडेवर घेऊन ड्यूटी करताना थोडा त्रास होतो, पण आईची माया बाळासाठी अशी अनेक संकट डोक्यावर घेऊ शकते. याबद्दल बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांनी माहिती मिळताच त्यांनी पूजा कुमारी हिच्या निष्ठेचं कौतुक केलं आणि बाळाला घेऊन ड्यूटी करू नको असं सांगितलं. मात्र बाळाचा सांभाळ करायला घरात कोणी नसल्याने त्याला सोबत घेऊन ड्यूटी करावी लागत असल्याचे पूजाने सांगितले. पूजासारख्या अनेक महिला आज प्रतिकूल परिस्थितीतही देशसेवेसाठी घराबाहेर राहून ड्यूटी करीत आहेत. संबंधित - आता एवढंच बाकी होतं! एक पुरुष प्रेग्नेंट असल्याचे आले रिपोर्ट आणि... क्रिकेटपटूंनाही बसला कोरोनाचा फटका, रणजी चॅम्पियन खेळाडूंचा विवाह सोहळा लांबणीवर 'साहेब, भूक लागली आहे खायला द्या, 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा घास नाही'   संपादन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या