Home /News /national /

Assembly Elections: पंजाबमध्ये 117 जागांसाठी तर यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, या दिग्गजांचं आज ठरणार भवितव्य

Assembly Elections: पंजाबमध्ये 117 जागांसाठी तर यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, या दिग्गजांचं आज ठरणार भवितव्य

Assembly Elections: आज पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

    नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी: पंजाबमध्ये (Punjab) आज विधानसभा निवडणूक (Assembly elections) होत आहे. राज्यातील 117 विधानसभा जागांवर नशीब आजमावणाऱ्या 1304 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. आज 2.14 कोटींहून अधिक मतदार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समध्ये (EVM)आपलं मत टाकतील. यामध्ये 93 महिला उमेदवारांचाही समावेश आहे. यूपीमध्येही (UP) तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंजाबमधील 117 विधानसभा मतदारसंघात सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पंजाबमधील 117 विधानसभा जागांसाठी एकूण 24,740 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून यापैकी 2013 मतदान केंद्रे संवेदनशील श्रेणीत चिन्हांकित करण्यात आली आहेत. मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पंजाबमध्ये प्रशासनाने मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. पोलिसांसोबतच केंद्रीय दलाचे कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात असतील. मतदान केंद्राभोवती कलम 144 लागू करण्यात आले आहे. कडेकोट बंदोबस्तात मतदान पक्ष मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुकाने, कारखाने किंवा इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या मजुरांना पगारी सुट्टीही जाहीर केली आहे. यूपीमध्येही तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यातील निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 16 जिल्ह्यातील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांवर एकूण 627 उमेदवार रिंगणात आहेत. 2.15 कोटीहून अधिक मतदार 627 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये ठरवतील. यूपीच्या ज्या 59 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार आहे. त्यात हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फारुखाबाद, कन्नौज, इटावा, औरैया, कानपूर देहात, कानपूर नगर, जालौन, झांसी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यांचा समावेश आहे. अखिलेश-शिवपाल यांच्या जागेवरही मतदान ज्या विधानसभा मतदारसंघातून अखिलेश यादव करहलमधून निवडणूक लढवत आहेत, त्या जागेवरही आज मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल हे देखील भाजपच्या तिकीटावर करहल मतदारसंघातून रिंगणात आहेत. शिवपाल यादव यांची जागा असलेल्या जसवंतनगरमध्येही मतदान होणार आहे. करहलमधील प्रत्येक बूथवर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 59 पैकी 13 विधानसभेच्या जागा संवेदनशील प्रवर्गात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये करहल विधानसभा मतदारसंघ तसेच अलीगंज, सादाबाद, आर्य नगर, सिसामऊ, किडवाई नगर, कानपूर कॅंट विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कानपूरमध्ये एअर अॅम्ब्युलन्स आणि झाशीमध्ये हेलिकॉप्टरची व्यवस्था निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यूपी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 866 कंपनी केंद्रीय दले तैनात करण्यात आली आहेत. यापैकी 860 कंपन्या बूथ सुरक्षा कर्तव्यात असतील, 17 कंपन्या स्ट्राँग रूममध्ये, पाच कंपन्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय यूपी पोलिसांचे 5154 निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 50597 कॉन्स्टेबल, 39 कंपनी पीएसी, 49905 होमगार्ड, 1330 पीआरडी जवान, 10425 ग्राम वॉचमन कर्तव्यावर तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी कानपूरमध्ये एअर अॅम्ब्युलन्स आणि झाशीमध्ये हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यूपीमध्ये या दिग्गजांचे भवितव्य पणाला यूपी विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सपा अध्यक्ष अखिलेश यादव, शिवपाल सिंह यादव आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल तसेच कानपूरच्या महराजपूर मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते सतीश महाना, हाथरस जिल्ह्यातील सादाबाद मतदारसंघातून रामवीर उपाध्याय, फारुखाबाद सदरमधून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद, कन्नौज सदर विधानसभा मतदारसंघातून कानपूरचे पोलीस आयुक्तअसीम अरुण यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Assembly Election, Punjab, UP Election, Uttar pradesh news

    पुढील बातम्या