लखनौ, 11 मार्च : निवडणूक निकालानंतर काही कार्यकर्त्यांना, नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंच. पण काही जणांना पराभव पचवणं अवघड जातं. हरणं जिव्हारी लागतं. काल झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एक धक्कादायक बातमी आली आहे. निवडणुकीतला पराभव एका नेत्याने पराभव जिव्हारी लागल्याने थेट टोकाचं पाऊल उचलत विधान भवनाच्या जवळच स्वतःला पेटवून घेतलं. भारतीय जनता पक्षाने (BJP wins Uttar Pradesh Assembly Election result tally) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या मोठ्या यशामुळे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांनाही जनतेनं दाद दिली नसल्याचं स्पष्ट होत आहे. पक्षाचा हा पराभव अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या जिव्हारी लागला आहे. यातूनच समाजवादी पक्षाचे कानपूरचे उपाध्यक्ष नरेंद्र सिंह उर्फ ‘पिंटू’ यांनी (SP Kanpur Vice President Narendra Singh) 10 मार्चला लखनौ येथे विधान भवनाबाहेर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा (Suicide attempt) प्रयत्न केला. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. नरेंद्र सिंह 30 टक्के भाजले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. याबाबत हजरतगंज पोलिस ठाण्याचे मुख्य अधिकारी श्याम बाबू शुक्ला यांनी सांगितलं, की नरेंद्र सिंह यांच्या या कृतीमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही.
UP Election Result 2022: काँग्रेसचा इतिहासातील सर्वात वाईट रेकॉर्ड, प्रियंका गांधी यूपीत फेलया घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं, की एक व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे कानपूरचे उपाध्यक्ष असलेले नरेंद्र सिंह गुरुवारी (10 मार्च 2022) कानपूरहून लखनौला आले. निवडणुकीचे निकाल ऐकताना भाजप सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकत असल्याचं ऐकल्यानंतर ते बादलीत पेट्रोल घेऊन विधान भवनाबाहेर आले आणि अंगावर पेट्रोल ओतून त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. आग लागल्याचं पाहून काही अंतरावर उभ्या असलेल्या पोलिस पथकाने त्यांच्याकडे धाव घेऊन आग विझवली आणि नरेंद्र सिंह यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं.
नरेंद्र सिंह यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना समाजवादी पक्षाचे कानपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. इम्रान म्हणाले, ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समधल्या (ईव्हीएम) (EVM) अनियमिततेमुळे पक्षाला निवडणुकीत भाजपकडून (BJP) पराभव स्वीकारावा लागल्याची भावना नरेंद्र सिंह यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी हे आत्महत्येचं पाऊल उचललं.’
महाविकास आघाडी सरकार धोक्यात? आदित्य ठाकरेंनी दिलं थेट उत्तर, म्हणाले…उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), मणिपूर (Manipur) आणि गोवा (Goa) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये विजय मिळवला. देशातलं सर्वांत मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधली निवडणूक तर भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालचं सरकार असलेल्या भाजपनं पुन्हा एकदा बहुमत मिळवून तिथे दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा इतिहास घडवला. उत्तर प्रदेशमध्ये दीर्घ काळ सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाने (Samajvadi Party) भाजपला टक्कर देण्याचा कसून प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना साफ अपयश आलं. कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि इतर अशा अनेक विरोधकांवर मात करून भाजपनं तिथे पुन्हा आपला झेंडा फडकवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचा, कार्याचा हा विजय आहे, असं मानलं जात आहे. भाजपचा हा विजय समाजवादी पक्षाला जिव्हारी लागला आहे.