जाहिरात
मराठी बातम्या / देश / आसाम सरकारची अतिक्रमणाविरोधातली मोहिम नडली, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन ग्रामस्थांचा मृत्यू

आसाम सरकारची अतिक्रमणाविरोधातली मोहिम नडली, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन ग्रामस्थांचा मृत्यू

आसाम सरकारची अतिक्रमणाविरोधातली मोहिम नडली, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन ग्रामस्थांचा मृत्यू

आसाम (Assam) राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या आसाम राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार (Violention) झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

आसाम, 24 सप्टेंबर: आसाम (Assam) राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या आसाम राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार (Violention) झाला आहे. दरांग (Darrang) जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. तसंच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात (Firing) दोन जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे एका पत्रकारानं अर्धमेल्या अवस्थेतील व्यक्तीला पोलिसांसमोर मारहाण केल्याचं देखील व्हिडिओतून समोर आलं आहे. या पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. या हिंसाचारानंतर आसाममधील भाजप सरकार आणि प्रशासन यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नेमकी घटना काय? आसाममधील राज्य सरकारची राज्यात अतिक्रमणाविरोधात मोहिम सुरु आहे. या मोहिमेतंर्गत दरांग जिल्ह्यातील ढालपूर भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. गुरुवारी अवैध अतिक्रमणाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना स्थानिकांनी विरोध केला. हा विरोध पांगवण्यासाठी पोलिसांनी निःशस्त्र स्थानिकांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या या गोळीबारात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये हा हिंसाचार झाल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे या व्हिडिओमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीसोबत अमानवीय वर्तवणूक केल्याचंही दिसून येतंय. IPL 2021: हैदराबादला धक्का, आक्रमक खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी परतणार   दुसरीकडे या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या कथित कॅमेरामन- पत्रकारनंही बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला मारहाण केली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळावरुन बाजूला केलं. या हिंसाचारात 9 पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती दरांगचे पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा सरमा यांनी दिली. जखमींन रुग्णालयात दाखल केलं असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचंही म्हटलं आहे. काँग्रेसकडून टीका या घटनेनंतर काँग्रेसकडून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावर टीका करण्यात आली आहे. दरांग जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्री सरमा यांचे छोटे भाऊ आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा गोळीबार केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. हा हिंसाचार राज्य सरकारनंच घडवून आणला असल्याचं म्हटलं आहे. गोवा काँग्रेसमध्ये गोंधळ,  आमदारांच्या हालचालींनंतर गिरीश चोडणकर दिल्लीत आता या हिंसाचाराचे पडसाद उमटल्यानंतर सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पत्रकारालाही अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: assam
  • First Published :
जाहिरात
जाहिरात