मुंबई, 24 सप्टेंबर : आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात तळाशी असलेल्या सनरायझर्स हैदराबादला (SRH) आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा आक्रमक बॅट्समन शेरफेन रदफोर्ड (Sherfane Rutherford) स्पर्धा सोडून मायदेशी परतणार आहे. रदरफोर्डच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यामुळे तो बायो-बबल सोडून तातडीनं मायदेशी परतणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं ही माहिती दिली आहे. सनरायझर्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही बातमी शेअर केली आहे. ‘सनरायझर्स हैदराबाद परिवार रदरफोर्डच्या वडिलांचं निधन झाल्याबद्दल त्याच्या परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करत आहे. या बिकट परिस्थितीमध्ये रदरफोर्ड त्याच्या कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी आयपीएलचा बायो-बबल सोडणार आहे.’
The #SRH family conveys its heartfelt condolences to Sherfane Rutherford and his family on the passing away of his father.
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 23, 2021
Sherfane will be leaving the IPL bio-bubble to be with his family in this difficult hour.#OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021 pic.twitter.com/cQTbJD2paK
रदरफोर्डनंही त्याच्या वडिलांचे जुने फोटो सोशल मीडियाव शेअर केले आहेत.‘मृत्यू ही सर्वात अवघड गोष्ट होते. हे असं का झालं असा प्रश्न मला पडला आहे, पण याचं उत्तर देवाकडंच आहे. माझे वडिल मला आयुष्यभरासाठी एकटं सोडून गेले आहेत. आम्ही अनेक प्लॅन बनवले होत, पण आता काहीही होणार नाही.‘अशी भावना त्यानं व्यक्त केली आहे. इंग्लंडचा विकेट किपर - बॅट्समन जॉनी बेअरस्टोनं माघार घेतल्यानंतर रदरफोर्डचा सनरायझर्स टीममध्ये समावेश करण्यात आला होता. तो यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स टीमचाही सदस्य होता. तसंच यंदा कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा जिंकणाऱ्या सेंट किट्स टीमचाही तो सदस्य होता. IPL 2021, DC vs SRH : दिल्ली पुन्हा टॉपवर, हैदराबाद ‘प्ले-ऑफ’ मधून आऊट! हैदराबादची टीम सध्या आयपीएल पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे. त्यांनी आत्तापर्यंत 8 पैकी फक्त 1 मॅच जिंकली असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. हैदराबादची पुढील लढत पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध होणार आहे.