ऐझॉल, 31 जुलै: मागील आठवड्यात कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगते शहरात झालेल्या हिंसाचार (Violence) संदर्भात मिझोरम पोलिसांनी (Mizoram Police) आसामचे मुख्यमंत्री (Assam CM) हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यासह चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR) केला आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक जॉन एन यांनी सांगितलं आहे. थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, आसाम आणि मिझोराम पोलीस दलात चकमक झाल्यानंतर, सोमवारी रात्री उशीरा राज्य पोलिसांकडून वैरेंगते पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आसाम पोलिसांच्या जवळपास 200 अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-एक-दोन नव्हे भाजप इथे नेमणार 5 उपमुख्यमंत्री; ‘मिशन 2023’ची तयारी
मिझोरामच्या सहा सरकारी अधिकाऱ्यांना आसाम पोलिसांनी समन्स बजावला
दरम्यान, आसाम पोलिसांनी कोलासिब जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि उप आयुक्त यांच्यासह मिझोराम सरकारच्या सहा अधिकाऱ्यांना समन्स बजावला आहे. यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी धोलाई पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-बळीराजा संतापला, BJP नेत्यावर हल्ला; कपडेही फाडले, एकाच आठवड्यातील दुसरी घटना
आसाम पोलिसांच्या एका सूत्रानं शुक्रवारी सांगितलं की, संबंधित अधिकाऱ्यांना 28 जुलै रोजी समन्स जारी करण्यात आला होता. याच्या दोन दिवस आधी, कछार जिल्ह्यातील लैलापूर याठिकाणी आसाम आणि मिझोराम पोलीस दलांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. ज्यामध्ये आसामचे पाच पोलीस कर्मचारी आणि एक रहिवाशाचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणी धोलाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर देशभर पडसाद उमटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.