श्रीगंगानगर, 30 जुलै : राजस्थानातील (Rajasthan) श्रीगंगानगरमध्ये राज्य सरकारविरोधात सुरू असलेल्या भाजपच्या जिल्हा स्तरीय आंदोलनात सामील होण्यासाठी आलेले हनुमागडमध्ये भाजप कार्यकर्ता आणि SC मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवाल यांचे (Kailash Meghwal) शेतकऱ्यांनी महाराजा गंगासिंह चौकवर कपडे फाडले. भाजपा कार्यकर्ता कैलाश मेघवाल यांचे कपडे फाडल्याच्या वृत्तानंतर भागात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कैलाश मेघवाल यांची सुटका केली. दरम्यान शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बल प्रयोग केल्याचंही वृत्त आहे.
पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठी हल्ल्यात अनेक शेतकरी कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सध्या श्रीगंगानगर जिल्हा कलेक्ट्रेट, महाराजा गंगा सिंह चौक, भगत सिंह चौक रोडवर तणावाचं वातावरण आहे. सावधानता म्हणून पोलिसांची टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा द्वारा राज्य सरकारविरुद्ध विविध लोककल्याणकारी मुद्द्यांवर सेंट्रल जेलच्या समोर आंदोलन केलं जात आहे. तर यामध्ये किसान मोर्चाच्या आव्हानावर केंद्राच्या तीनही कृषीकायद्याविरोधात भाजपचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराजा गंगा सिंह चौकावर आंदोलन पुकारलं आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी भाजप नेत्यावर हल्ला केला आणि कपडे फाडले आहेत.
हे ही वाचा-एक-दोन नव्हे भाजप इथे नेमणार 5 उपमुख्यमंत्री; ‘मिशन 2023’ची तयारी
भाजप कार्यकर्ता आणि SC मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवालवर शेतकऱ्यांनी हल्ला केला. यानंतर राजस्थानातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या गहलोत सरकारवर निशाणा साधत आहे. यामध्ये योगी बालकनाथनेही मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, भाजप राजस्थान एससी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवाल यांच्यावर हल्ला हा राजस्थानातील कायद्याच्या व्यवस्थेची वास्तवित स्थिती व्यक्त करतो. या हल्ल्याचा जितका निषेध केला जावा तितका कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Farmer protest, Rajasthan