मराठी बातम्या /बातम्या /देश /

पंतप्रधान मोदींच्या सभेत माईकमुळे अडथळा, तपासासाठी IAS अधिकाऱ्यांची समिती स्थापन

पंतप्रधान मोदींच्या सभेत माईकमुळे अडथळा, तपासासाठी IAS अधिकाऱ्यांची समिती स्थापन

शिवसागरमध्ये पंतप्रधान (PM Narendra Modi) भाषण करत असताना ध्वनी यंत्रणेत अडचण कशी आली? कोणाच्या चुकीमुळे आली? हा सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसागरमध्ये पंतप्रधान (PM Narendra Modi) भाषण करत असताना ध्वनी यंत्रणेत अडचण कशी आली? कोणाच्या चुकीमुळे आली? हा सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसागरमध्ये पंतप्रधान (PM Narendra Modi) भाषण करत असताना ध्वनी यंत्रणेत अडचण कशी आली? कोणाच्या चुकीमुळे आली? हा सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आसाम , 4 फेब्रुवारी: आसाम सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 23 जानेवारीच्या सभेत ध्वनी यंत्रणेतील अडचणीचे कारण शोधण्यासाठी वरिष्ठ आयएसएस (IAS) अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. 23 जानेवारीला आसामच्या शिवसागरमध्ये (Shivsagar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. यावेळी त्यांच्या सभेत ध्वनी यंत्रणेत अडचण आली होती. यामुळे जवळपास 20 सेकंद पंतप्रधान मोदींच्या भाषणात अडथळा आला होता.

या सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये आवाज यंत्रणेत अडथळा निर्माण होत असताना 'मायक्रोफोन दुरुस्त करा, त्यांच्यामुळे भाषणात अडचण येत असल्याचं बोलताना दिसून आलं होते. मॉनिटरच्या साउंड बॉक्ससमोर माईक ठेवल्यानं  जवळपास 20 सेकंद हा आवाज येत होता. परंतु त्यानंतर हा माईक दूर केल्यानंतर संपूर्ण भाषणात कोणताही अडथळा आला नव्हता. या भाषणात ही अडचण आल्यानंतर शिवसागर जिल्हा प्रशासनाने (Shivasagar district authority) देखील याच्या तपासासाठी एका कमिटीची स्थापना केली होती. यावेळी या कमिटीमध्ये शिवसागरचे उपायुक्त बिष्णू के बोरा यांच्या माहितीनुसार या चौकशीचा अहवाल 27 जानेवारीला प्राप्त झाला आहे. पुढील चौकशीसाठी हा अहवाल सचिवालयात पाठवला आहे. त्यानंतर आता थेट आसाम सरकारने उच्च अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन केली असून या कमिटीला 15 दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करायचा आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी आयुक्त व सचिव मोलोय बोरा असतील. त्यांच्याबरोबर या समितीत पूर्वेकडील रेंजचे डीआयजी व्ही. पी. गंजला आणि पीएसयू एएमट्रॉनचे व्यवस्थापक श्यामल कुमार भुयान यांचा समावेश आहे. आयुक्त व गृह आणि राजकीय विभागाच्या सचिवांनी  अधिसूचना जारी करुन ही समिती स्थापन केली असून 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तीन सदस्यीय समिती मोदींच्या सभेवेळी वापरलेल्या पी. ए. सिस्टिममध्ये काही तांत्रिक अडचण होती का यामागील कारणं आणि सत्यता पडताळणार आहे. याचबरोबर कुणी जाणूनबुजून यामध्ये बिघाड केला आहे का? याचादेखील तपास ही समिती करणार आहे आणि याचा अहवाल सादर करणार आहे.

हे देखील वाचा - 'KGF: Chapter 2 च्या प्रदर्शनाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा', चाहत्याची पंतप्रधानांकडे मागणी

23 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी शिवसागरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी शिवसागरमधील ऐतिहासिक जेरेंगा पोथर(Jerenga Pothar) येथे भूमीहीन 1 लाख 6 हजार नागरिकांना शेतजमिनीचे प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. यावेळी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 10 भूमीहीन नागरिकांना शेती प्रमाणपत्र देत या योजनेचा शुभारंभ केला होता.

First published:

Tags: Assam, India, Narendra modi, PM, Pm narendra mdi