मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'KGF: Chapter 2 च्या प्रदर्शनाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा', चाहत्याची पंतप्रधानांकडे मागणी

'KGF: Chapter 2 च्या प्रदर्शनाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा', चाहत्याची पंतप्रधानांकडे मागणी

बहुप्रतिक्षित चित्रपट 'KGF Chapter 2' यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागाने एकप्रकारे चाहत्यांना वेडच लावले आहे. आता दुसऱ्या भागासाठी चाहते उत्सुक आहेत आण अशाच एका चाहत्याने एक अजब मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 04 फेब्रुवारी: बहुप्रतिक्षित चित्रपट 'KGF Chapter 2' यावर्षी प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'केजीएफ 2' चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यशच्या चाहत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे 'KGF Chapter 2'च्या प्रदर्शना दिवशी राष्ट्रीय सुट्टी (National Holiday) जाहीर करा अशी मागणी केली आहे. यानंतर या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे याचा अंदाज लावता येईल.

'KGF Chapter 2' चित्रपट 16 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ट्विटरवरुन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली होती. यशने देखील याबाबत ट्वीट शेअर केले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कळताच यशच्या चाहत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी नॅशनल हॉलिडे जाहीर करा अशी मागणी केली आहे. यशच्या चाहत्याने पंतप्रधान मोदींना पाठवलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात यशच्या चाहत्याने असे लिहिले आहे की, 'आपल्या सर्वांना माहिती आहे की यश स्टारर 'KGF: Chapter 2' चित्रपट 16 जुलैला शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. मोठ्या प्रमाणात लोकं या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आम्ही आपल्याला या दिवशी नॅशनल हॉलिडे जाहीर करा अशी विनंती करतो. कृपया आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. हा फक्त चित्रपट नाही तर ही आमची भावना आहे. धन्यवाद....रॉकिंग स्टार यश बॉसचा चाहता!' हे पत्र या चाहत्याने पंतप्रधानांना उद्देशून लिहिले आहे.

@styles_rocking या ट्विटर युजरने हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले असून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तयशच्या इतर चाहत्यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे पत्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विनंतीचा विचार करावा असे आवाहन केले आहे. 'KGF: Chapter 2' चित्रपट 23 ऑक्टोबर 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

(हे वाचा-संजय दत्तनं बायकोला दिलं तब्बल 100 कोटींचं गिफ्ट, बायकोनं मात्र लगोलग केलं परत)

KGF Chapter 2 हा कन्नड चित्रपट KGF चा दुसरा भाग आहे. या चित्रपटात कन्नड अभिनेता यशने मुख्य भूमिका साकारली आहे. 'KGF' च्या यशानंतर दिग्दर्शक प्रेक्षकांसाठी 'KGF Chapter 2' हा चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटात देखील यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त अधीराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood, मनोरंजन