जाहिरात
मराठी बातम्या / देश / महाविकास आघाडीत धुसफूस?; अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल

महाविकास आघाडीत धुसफूस?; अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल

'भाजपला जर मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर आम्ही भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय देण्यासाठी  तयार आहोत'

'भाजपला जर मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर आम्ही भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय देण्यासाठी तयार आहोत'

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महिला बालकल्याण मंत्री यसोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जुलै : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वकाही आलबेल सुरू असल्याचं सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी तिन्ही पक्षांत धुसफूस सुरू असल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि महिला बालकल्याण मंत्री यसोमती ठाकूर (Yashomati Thakur) दिल्लीत दाखल झाले आहेत. यामुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर हे दिल्तीत दाखल झाले असून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या धुसफूस संदर्भात या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp स्टेटस काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा लखनऊ येथे पोहोचले होते. लखनऊ येथे नाना पटोले यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यासोबतच विधासभेचे रिक्त असलेले अध्यक्षपद या संदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आल्यावर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अध्यक्षपदवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तसेच राज्यमंत्रिमंडळात येत्या काळात खांदेपालट होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात