• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp स्टेटस

Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे मराठी मेसेज, Facebook, WhatsApp स्टेटस

Ashadhi Ekadashi 2021 Messages: आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देणारे खास मराठमोळे मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 • Share this:
  मुंबई, 19 जुलै: Ashadhi Ekadashi 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: आषाढी एकादशीला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) असे म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी (Devshayani Ashadhi Ekadashi) असे सुद्धा म्हटले जाते. यंदा 20 जुलै 2021 रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाकडून काढण्यात येणारी पायी वारी (Wari) याला एक मोठी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून वारीची ही परंपरा आजही कायम आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून वारकऱ्यांना पायी वारी करता येत नाहीये. मात्र, असे असले तरी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन दर्शन घेऊ शकतात. तसेच आषाढी एकादशी निमित्त तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना शुभेच्छा देऊ शकतात. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस (Ashadhi Ekadashi 2021 Messages) सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Ashadhi Ekadashi 2021 Messages)

  देव दिसे ठाई ठाई,

  भक्तलीन भक्तापाई

  सुखालाही आला या हो आनंदाचा पूर

  चालला नामाचा गजर

  अवघे गरजे पंढरपूर

  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!

  अवघा रंग एक झाला

  रंगी रंगला श्रीरंग...

  देवशयनी आषाढी

  एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  तुझा रे आधार मला

  तूच रे पाठीराखा

  तूच रे माझ्या पांडुरंगा

  चुका माझ्या देवा

  घे रे तुझ्या पोटी

  तुझे नाम ओठी सदा राहो

  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!

  टाळ वाजे, मृदुंग वाजे

  वाजे हरीच्या वीणा !

  माऊली निघाले पंढरपुरा,

  मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला...!

  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा... !

  पाणी घालतो तुळशीला !

  वंदन करतो देवाला !

  सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना

  हिच प्रार्थना पांडुरंगाला

  सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा

  सोहळा जमला

  आषाढी वारीचा

  सण आला पंढरीचा

  मेळा जमला भक्तगणांचा

  ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा

  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

  हेची दान देगा देवा

  तुझा विसर न व्हावा

  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

  Published by:Sunil Desale
  First published: