Covid-19 विरुद्धच्या लढ्यात कोरोनायोद्ध्यांच्या मदतीला आता रणांगणावरचे खरोखरचे योद्धे

Covid-19 विरुद्धच्या लढ्यात कोरोनायोद्ध्यांच्या मदतीला आता रणांगणावरचे खरोखरचे योद्धे

सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांनी प्रत्यक्ष कोरोनाविरुद्धच्या युद्धात सहभाग घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल - भारतात गेल्या वर्षी संपूर्ण देशभर लॉकडाउन (Coronavirus Lockdown in India) जाहीर करतानाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi latest speech) वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी, त्यासंबंधी सेवा पुरवणारे सर्व सरकारी अधिकारी यांना उद्देशून नवा शब्दप्रयोग सुरू केला होता तो म्हणजे कोरोना योद्धा (Corona Warriors). कोरोना विषाणूच्या जबरदस्त हल्ल्यात आघाडीवर राहून प्रसंगी आपले प्राण गमावून या योद्ध्यांनी भारतवासीयांचे प्राण वाचवले. त्यांच्या गौरवार्थ देशातील विविध हॉस्पिटलवर भारतीय सैन्याच्या वतीने पुष्पवृष्टीही करण्यात आली होती. आता एका वर्षानंतर सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांनी प्रत्यक्ष कोरोनाविरुद्धच्या युद्धात सहभाग घेतला आहे. अर्थात त्या आधीही आवश्यकतेनुसार ही तिन्ही दलं मदत करत होतीच पण आता प्रत्यक्ष आघाडीवर ती दिसत आहेत. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत आणि ऑक्सिजनची प्रचंड टंचाई जाणवत आहे. अशा वेळी लष्कर आणि वायूदलाच्या जवानांनी ही आघाडी सांभाळली आहे. दिल्ली आणि इतर शहरांतील गरज असलेल्या ठिकाणी लष्करातील डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी कार्यरत झाले आहेत. एकीकडे डीआरडीओने (DRDO डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) दिल्लीत सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये लष्करातील डॉक्टर सेवा देत आहेत तर दुसरीकडे भारतीय वायुसेनेने कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि बेंगळुरूतील डॉक्टरांना हवाई मार्गानी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आहे.

कोविडविरुद्धच्या लढ्यात जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत असं भारतीय वायुदलानी स्पष्ट केलं असून त्यांनी बेंगळुरूतील डीआरडीओमधील ऑक्सिजन टाक्या दिल्लीतील कोविड केंद्रांपर्यं पोहोचवल्या आहेत. रेग्युलेटर्स, ट्रॉलीज आणि अत्यावश्यक औषधांची वाहतूकही वायुसेना करत आहे. अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये आर्मीचे 10 डॉक्टर पाठवण्यात आले असून, चार डॉक्टरना पाटण्यातील ईएसआय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील सागरमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये मदत करण्यासाठी लष्कराची एक टीम काम करत आहे. लष्करासाठीच्या 32 फ्लॅटबेड बोगींची ऑक्सिजन एक्सप्रेस ही विशेष ट्रेन मेडिकल ऑक्सिजन घेऊन विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली आहे.

corona संचारबंदीचं उल्लंघन पडलं महागात; पोलिसांच्या शिक्षेने तरुणाचा मृत्यू

देशभरातील कोविडवर उपचार करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सनी जाहीर केलं की त्यांच्याकडे केवळ काही तास पुरेल इतकाच मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध आहे त्यानंतर लष्कराने तातडीने मदत करायला सुरुवात केली. भारतात आज कोरोना महामारीतील सर्वाधिक 3 लाख 14 हजार 835 कोरोना रुग्ण सापडले असून जागतिक स्तरावरही एका दिवसात सापडलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 104 जणांचा मृत्यु झाला असून, दररोजच्या मृत्युंमध्येही प्रचंड वाढ झाली आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली'मध्ये घुसला कोरोना; 83 जण पॉझिटिव्ह

दिवसेंदिवस ऑक्सिजन सिलेंडर, औषधांची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेऊन कोरोना पीडितांच्या नातेवाईकांसोबतच प्रत्यक्ष कोरोना रुग्णही सोशल मीडियावरून ऑक्सिजन, रुग्णालयात बेड मिळवून देणं आणि औषधं मिळवून देण्यासाठी याचना करत आहे असं गेल्या काही आठवड्यांपासून दिसत आहे. त्यामुळे भारतीय लष्कर आणि वायू दलाने सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी हात पुढे केला असून ते युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांतून अनेक कोविड रुग्णांचे प्राण वाचतील अशी आशा करूया.

First published: April 22, 2021, 10:08 PM IST

ताज्या बातम्या